खूनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीस २ तासाचे आत अटक करण्यात तलासरी पोलीस ठाणे यांना यश

उपसंपादक – रणजित मस्के
पालघर :- दिनांक ०१/०३/२०२३ रोजी यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, फिर्यादी यांची मुलगी वय १० वर्षे हि सकाळी ०९.०० वाजताचे सुमारास शाळेत गेली परंतु ती परत आली नाही म्हणून तीचा आजुबाजुचे परीसरात तसेच नातेवाईकाकडे शोध घेतला असता ती मिळुन न आल्याने तीस कोणीतरी अज्ञात आरोपी यांने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन फुस लावुन पळवून नेले म्हणुन तलासरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं ६१/ २०२३ भादविसंक ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अजय बसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांना वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासाबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने श्री. अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी चार पथके तयार केली.
सदर पथकांनी तांत्रीक पुराव्यांच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसतांना सखोल व कौशल्यपूर्ण तपास करुन अवघ्या २ तासात संशयीत इसम वय ४५ वर्षे, रा. तलासरी यास ताब्यात घेऊन अपहरीत मुलीबाबत कसून चौकशी केली असता आरोपी याने सदर अपहरीत मुलीस गुजरात राज्यात घेऊन जावून तीच्यावर अतिप्रसंग करुन, गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. वरील नमुद गुन्ह्यात आरोपीस अटक करून भादवि कलम ३०२, ३७६, पोक्सो कायद्या अंतर्गत अधिकची कलमे समाविष्ट करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास हा अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.


सदरची कामगीरी ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अजय बसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे सपोनि / भरत पाटील, पोउपनि / उमेश रोटे, मपोउपनि / रिझवाना ककेरी, पोउपनि / समिर लोंढे, पोउपनि / भाऊ गायकवाड, पोउपनि / हर्षद शेख, सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे तसेच तलासरी पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com