कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीस कराड शहर पोलीसानी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :- कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न करुन सोनसाखळी जबरीने चोरणा-या सराईत गुंडांना शिताफीने जेरबंद करून हत्यार व रोकड असा मुद्देमाल केला हस्तगत. कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अति उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे.

कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत कराड शहरातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने कंबर कसली असुन गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे व गुन्हेगारी समुळ उच्चाटन करण्याचे कार्य कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदिप सुर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पो. उपनिरीक्षक राजु डांगे व त्यांचे पोलीस टीमने स्विकारले असून त्यादृष्टीने वाटचाल सुरु केलेली आहे.

श्री. गोविंद बाबुराव पवार, रा. मलकापूर ता. कराड हे दि. 19.10.2023 रोजी रात्रीचे जेवणानंतर फेर फटका मारत असताना मलकापूर ता. कराड गांवचे हद्दीत हॉटेल सफायर जवळ रोडवर अनोळखी इसमाने आठवून
हातातील कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न करीत गळयातील सुमारे ५ तोळे सोन्याची चैन जबरीने तोडुन चोरुन नेहत असताना गोविंद पवार यांनी आरडाओरडा करून चैन हाताने धरलेने सुमारे ३ तोळे ३ ग्रॅम वजनाची व अंदाजे किंमत रु. 132,000/- किमतीची सोन्याची चैन चोरटयाने तोडुन जबरीने चोरून नेहली होती त्यावरुन फिर्यादीने दिले तक्रारीवरून कराड शहर पोलीस स्टेशनला गु. र. नं. 1170/2023 चा गंभीर गुन्हा दाखल झालेला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी यांनी लागलीच

डी. बी. प्रमुख राजु डांगे, पोलीस उपनिरीक्षक व डी. बी. टीमला आदेश दिला होता. फिर्यादीने चोरटयाचे दिले वर्णनावरून व गोपनीय बातमी मिळवून सत्वरं तपासचक्रे फिरवत कसोशीने माहीतीच्या आधारे माहीतगार गुन्हेगार अशोक नंदाप्पा बिराजदार रा. शनिवारपेठ, कराड व जावेद गणी सुतार रा. रत्नागिरी गोडावूनचे मागे कराड या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल तपास केल्यावर त्यांनी गुन्हा केलेची कबुली दिली असून त्यांनी गुन्ह्यातील चोरलेला सोनसाखळी हस्तगत करणेत आलेली आहे. याशिवाय दोन्ही गुन्हेगारांकडुन कराड शहर पो. स्टे. गुन्हा रजि. नं. 1135 / 2023 मधील जुपीटर मोटार सायकल किं. रु. 20,000/- तसेच गु. र. नं. 1057/2023 मधील पानटपरीतून चोरलेले पैकी काही साहीत्य असा मुद्देमाल हस्तगत करून तीन गुन्हे उघडकीस आणणेत कराड शहर डी. बी. पथकाने यश मिळविलेले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजीराव विभुते, पोलीस उप निरिक्षक आर.एल.डांगे, सफो रघुवीर देसाई, सफी. संजय देवकुळे, पो. हवा. शशिकांत काळे, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पोलीस अंमलदार महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ व पो. कॉ. प्रशांत वाघमारे यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट