कोयता नाचवून दहशत करणारी टोळी शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जेरबंद

0
WhatsApp Image 2023-07-06 at 10.25.01 AM
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा:- शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि.01/07/20023 रोजी सायंकाळी 8.15 वा. चे सुमारास सैनीर चौक सातारा येथे पाच इसमांनी तक्रारदार नाम ओंकार पिलाजी पवारांना काय दाखन त्यांच्या खिशातील 2800/- रु. रोख रक्कम जवान घेतली व फिर्यादी यांचे चार चाकी गाडीवर कोयते मारुन गाडी फोडुन दहशत पसरवली होती म्हणून तोल तक्रारदार यांनी दिले तक्रारी वरुन इसम नामे सौरभ नितीन सपकाळ ऊर्फ लाल्या व बवाल्या आणि त्यांचे इतर तीन साथीदार यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 205/23 भा.द.वि.सं.क. 307,398 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा करून कार झाले होते.

सदरचा गुन्हा दाखल झालेने मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे व सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे च गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला कोयता नाचवून दहशत पसरविणाऱ्या आरोपांचा शोध घेवून तात्काळ अटक करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे दि. 02/03/2023 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी प पोलीस अंमलदार यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे म्हसवे येथे येण्णा नदीच्या परिसरातील शेतात लपुन बसले आहेत, अशी माहिती प्राप्त झालेने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे मिळाले माहितीनुसार येथील वेणा नदीच्या परिसरात पार चालु असताना नदीकाठी परिसरात आरोपीचा सलग सात से आठ तास उस शेतात व ओडनाल्यात शोध घेत असताना एका उसाचे शेतात संशयित चार आरोपी बसलेले दिसून आले त्यांचा चिखलातून पाठलाग करुन तीन आरोपींना पकडण्यात यश आले. त्यापैकी एक आरोपी उसाचे शेतातून पळून गेला. पळून गेलेल्या एका आरोपीचा सलग रात्री उशीरापर्यंत शोध घेवून त्यास पिलेश्वरी नगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर चारही आरोपींना पोलीस ठाणेस हजर करून त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने कसून तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याव आरोपी क्र.5 सौरभ नितीन सपकाळ यास तांत्रिक माहितीच्या आधारे शिराळा जि.सांगली येथून साय्यात येथून गुन्ह्याचे कामी हजर केले आहे. सदर आरोपीकडून दहशत माजविण्यासाठी वापरलेला कोणता, लोखंडी पाईप, दोन दुचाकी व 2100 रु. स्वयम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अशाप्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने 24 तासात गोपनीय माहितीच्या व तांत्रिक माहितीच्या आधारे नौर चौक सातारा येथे कोयता नाचवून दहशत माजविणा-या आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री समीर शेख मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्रीपतंगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे पाहा. सुरेश पांडके, सचिन माने, पोलीस नाईक निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, पो.कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे यांनी केली आहे.

आरोपींची नावे :-

  1. सौरभ नितीन सपकाळ वय 25 वर्षे रा. 19 अ रघुनाथपुरा पेठ करने ता. जि. सातारा
  2. सातारा ऋतविक धनंजय पंडीत वय 21 वर्षे रा.गडकर आळी कळकाच्या बेटाजवळ शाहूपुरी सातारा ,ता.जि. सातारा.
  3. अक्षय संतोष कदम वय 20 वर्षे रा. 36 करंजे पेठ सातारा ता. जि. सातारा .
  4. अतिष गौतम राजगुरु वय 22 वर्ष रा. दौलतनगर सातारा ता. जि. सातारा
  5. एक विधी संघर्ष बालक

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट