कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून परजिल्ह्यातील शस्त्रे विकणारे तस्कर यांचेकडून २ पिस्टल ७ जिवंत काडतूस असा एकूण २,६७०००/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- श्री समीर शेख, पोलीस अधिक्षक सौ सातारा श्री बापू नांगर अप्पर पोलीस अधिक्षक सो सातारा व श्री राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव विभाग कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली शस्त्रे विकणारी टोळी यांचेवर कारवाई करा अशा सुचना दिल्या त्या अनुशंगाने कोरेगाव पोलीस ठाणेकडील प्रभारी अधिकारी सखाराम बिराजदार यांनी पोलीस उपनिरिक्षक गणेश माने यांचे अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करून शस्त्रे पुरवणारे लोंकाची माहीती प्राप्त करून त्याचेवर कारवाई करणेचे आदेश दिले आहेत.
सहा पोलीस निरिक्षक सखाराम बिराजदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे सातारारोड उा कोरेगाव गावच्या हद्दीत एस्टी स्टैन्ड परिसरात आदर्श धनिनाथ हुलगे व रणजित नवनाथ साळुखे दोन्हीं रा करमाळा जिल्हा सोलापूर हे विनानंबरचे लाल काळ्या रंगाचे गाडीवरून संशयीतरित्या फिरत असून ते बनावट पिस्टल विक्रीसाठी आले आहेत अशी बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हेप्रकटीकरण पथकातील गणेश माने यांना कारवाई करणेबाबत सुचना दिल्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पथकाने मिळाले.

बातमीच्या ठिकाणी मौजे सातारारोड ता कोरेगाव गावच्या हद्दीत एस्टीस्टैन्ड परिसरात सापळा लावून दोन इसमांना ताबेत घेऊन २ देशी बनावट पिस्टल जिवंत काडतूस तसेच लाल काळे रंगाची विनानंबर प्लेट असलेली हिरो कंपनीची मोटारसायकल असा एकूण २,६,७०००/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करून कोरेगाव पोलीस ठाणे गुरन ३५२ / २०२३ भा.ह.क.३.२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्री समीर शेख, पोलीस अधिक्षक सो सातारा श्री बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सो सातारा व श्री राजेद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव विमान कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरिक्षक सखाराम बिराजदार प्रभारी अधिकारी कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील व पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरिक्षक गणेश माने पो हवा ज्ञानदेव साबळे, पो ना जोतिराम शिंदे पो ना विक्रांत लावंड, पो.कॉ प्रमोद जाधव, पो.कॉ समाधान शेडगे, पो.कॉ गणेश शेळके, पो.कॉ गणेश भग पो.कॉ. हेमंत सोनमले पो कॉ सचिन लावंड यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अमलदार याचे श्री समीर शेख, पोलीस अधिक्षक सो सातारा. श्री बापू बागर अप्पर पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com