कोंढवा पोलीसांनी पुर्व वैमनस्यातुन खुनाचा प्रयत्न करणारे व दहशत माजविणारे ७ आरोपी व २ विधी संघर्ष बालक यांना १२ तासात केली अटक..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

दि.११/०७/२०२५ रोजी गोकुळनगर चौक एस.बी.आय. कॉर्नर येथे सराईत गुन्हेगारांनी एका तरुणावर धारधार हत्यारांनी मारहाण करुन दहशत निर्माण केल्याची घटना घडली होती.
सदर बाबत अधिक माहिती अशी की, गोकुळनगर भागात राहणारे फिर्यादी हे दि.११/०/२०२५ रोजी रात्री २२/०० वा. चे सुमारास एस.बी.आय. बँकेचे शेजारी, पायी चालत घरी जात असताना त्यास आरोपी नामे १) राजु उर्फ राजा संगप्पा गुळकर, वय १८ वर्षे रा. साईनगर साळवे गार्डन रोड कोंढवा बुा. पुणे. २) तन्वीर अक्रम शेख, वय १९ वर्षे रा. सदर ३) सुरेंद्र उर्फ अमर भुवनेश्वर साव, वय १९ वर्षे रा. सदर ४) कैलास बाबुराव गायकवाड, वय २२ वर्षे रा. सदर ५) कविराज उर्फ केडी सुदाम देवकाते, वय १९ वर्षे रा. सदर ६) प्रेम उर्फ पप्या यल्लेश घुंगरगी वय २२ वर्षे रा. सदर ७) वश उर्फ मास अंवर सोनटक्के वय १८ वर्षे रा. सदर व दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी संगनमत करुन राजु उर्फ राजा संगप्पा गुळकर याच्या सोबत फिर्यादी याचे पुर्वीचे असणा-या वादातून पाहिजे आरोपी यांनी केलेल्या प्लॅनिंग प्रमाणे कोयते-तलवारीनी फिर्यादी याच्या डोक्यात, पाठीवर, कमरेच्या खाली, हातावर वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच गोकुळनगर भागात नागरिकांमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून तलवारी हवेत मिरकावुन सार्वजनिक शांतता भंग केली होती. म्हणून कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.न.-५३७/२०२५, भा.न्या.सं. कलम. १०९,१८९(२).१८९ (४).१९१ (१), १९१ (३),१९१ (३) सह आर्म अॅक्ट ४/२५. मपोका. ३७ (१) (३),१३५ तसेच क्रि. लॉ.अ. अॅ. कलम. ७ प्रमाणे दि.१२/०७/२०२५ रोजी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाची तात्काळ दखल घेवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती वर्षा देशमुख, यांनी आरोपी यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. सदर आदेशाप्रमाणे तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपी हे साळवे गार्डनच्या मागील रिकाम्या जागेत असणा-या पडीक रुममध्ये आसरा तयार करुन लपुन राहिले असल्याबाबत माहिती पोलीस अंमलदार सुरज शुक्ला, अभिजीत जाधव, विजय खेंगरे, राहुल शेलार यांना प्राप्त झाली होती. तेव्हा साळवे गार्डन मागील परिसरात चार पथके तयार करुन आरोपी यांना घेराव टाकुन पकडुन ताब्यात घेवुन त्याची नाव पत्ता विचारता त्यांनी वरिलप्रमाणे आपले नाव पत्ता सांगितले. सदर आरोपी यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याची मा. न्यायालयाने दि. १६/०७/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. नमुद गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक पंकज खोपडे हे करित आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परि.०५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती वर्षा देशमुख, यांच्या सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव व पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, विजय खेगरे, राहुल थोरात, अनिल बनकर, सुजित मदन, विकास मरगळे, केशव हिरवे, राहुल शेलार, शरद पवार यांनी केली आहे.