कोंढवा पोलीसांकडून रूट मार्चचे आयोजन संपन्न..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे :
आगामी रमजान ईद, राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आज दि. 22/03/2025 रोजी 19/00 वा. ते 20/00 वा. चे दरम्यान कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रूट मार्चचा मार्ग :- कोंढवा पोलीस स्टेशन येथून सुरुवात ते आशीर्वाद चौक ते सत्यानंद हॉस्पिटल ते बादशहा नगर सोसायटी ते कोणार्क पुरम सोसायटी ते भैरवनाथ मंदिर ते भीम नगर ते नरवीर तानाजी मालुसरे चौक ते ज्योती हॉटेल चौक उजवीकडे वळून मेफेयर एलिगंजा सोसायटी उजवीकडे वळून बाबर बँक्वेट हॉल ते हॉटेल ग्रँड दरबार ते डावीकडे वळून वेलकम हॉल चौक ते शितल पंप उजवीकडे वळून आशीर्वाद चौक येथे समाप्त
सदर रूट मार्च करिता
आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक (गुन्हे) तसेच SRPF ग्रुप नंबर 2 गोल्फ वनकडील 1 अधिकारी 15 अंमलदार , RCP स्ट्राइकिंग कडील 01अधिकारी व 05 अंमलदार , कोंढवा पोलीस स्टेशन कडील 06 अधिकारी 30 अंमलदार , कोंढवा मार्शल 02 तसेच पीटर मोबाईल यांचाही समावेश करण्यात आला होता.
अशी माहीती
(विनय पाटणकर)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कोंढवा पोलीस ठाणे यानी दिली.