कोंढवा पोलीसांकडून विभागातील इस्टेट एजंटना फ्लॅट खरेदी , विक्री व भाड्यावर देण्याबाबत विशेष सुचना. .

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
आज दिनांक 02/05/2025 रोजी सायंकाळी 18/00 ते 19/00 वाजेच्या दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील इस्टेट एजंट यांची बैठकy घेण्यात आली
सदर बैठकीस उपस्थित सदस्यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या


- घरमालक व भाडेकरू यांची कागदपत्रे पाहून खात्री करून रजिस्टर एग्रीमेंट करावे व त्याबाबत त्यांच्याकडील रजिस्टरला व्यवस्थित नोंदी घ्याव्यात.
- परदेशी नागरिकांचे
व्हेरिफिकेशन करते वेळी त्यांचे
सी फॉर्म,मूळ पासपोर्ट, हिसा सी
फॉर्म पाहून ते खात्री करून
व्हॅलिड असल्याचे पाहून पोलीस
स्टेशन येथे माहिती कळवावी
- परदेशी नागरिकांचे
- तसेच अधून मधून जे भाडेकरू यांची माहिती पोलीस ठाणे दिलेली आहे त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे
- भाडेकरूंची हालचाल संशयस्पद
वाटल्यास तात्काळ पोलीस स्टेशन
आम्हास संपर्क करावा - इस्टेट एजंट यांनी भाडेकरूंची माहिती खोटी दिल्याचे आढळून आले त्यांच्यावर प्रचलित कायद्याने कारवाई करण्यात येईल याची माहिती देण्यात आली
- हेवी डिपॉझिट वर एखाद्याला फ्लॅट भाड्याने देणे हे बेकायदेशीर आहे
येणे प्रमाणे सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या देखील अडचणी ऐकून त्याबाबत त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आहे. सदर मिटींगला कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण 29 इस्टेट एजंट हजर होते.
माहिती आदरपूर्वक सादर
(विनय पाटणकर)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर