स्वःसरंक्षणासाठी बेकायदेशीर पिस्टल बाळगणा-या सराईत आरोपीस कोंढवा पोलीस ठाणेकडून अटक…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :– मा. पोलीस आयुक्त साो यांनी येवु घातलेल्या विधानसभा च लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीर हत्यारे बाळगणा-या आरोपी यांवा शोध घेवुन कारव करण्याबाबत आदेशित केले होते.

त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचना प्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील व तपासपथक हे माहिती काढत होते. माहिती काढूत असताना तपास पथकातील अंमलदार अभिजीत जाधव, विकास मरगळे यांना माहिती प्राप्त झाली की, सागर पवार नावाचा इसम नन्हे भुमकर चौक श्लोक अर्पा, फलॅट नं.४०१, पुणे येथे राहत असुन त्याचेकडे पिस्टल सारखे हत्यार असुन ते तो लपवुन त्याच्या कमरेला लावुन फिरत असतो. तो दि.१९/०२/२०२४ रोजी सकाळी १०.००वा सुमारास कात्रज ते कोंढवा रोड वरिल केसर लॉजच्या मागिल रोडवर कोणाला तरी भेटण्यासाठी येणार आहे.

त्याने अंगात ग्रे रंगाचा टि शर्ट घातलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली. । सदर माहितीप्रमाणे केसर लॉज जवळ जावुन गाडी आडबाजुला थांबवुन सोबतच्या स्टाफला रोडच्या बाजुबाजुला सापळा रचुन थांबण्यास सांगितले. मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम हा कान्हा हॉटेल चौकात बसमधुन उतरुन पायी चालत केसर लॉजच्या मागील रोडवर आडबाजुस जावुन थांबला बातमीदाराने सदर इसम तोच असल्याचे सांगितल्याबाबत बातमीप्रमाणे सांगितल्यावर सदर इसमास पकडण्याकामी गेलो असता तो पळून जावु लागला, त्यास सोबतच्या स्टाफच्या मदतीने थोडयाच अंतरावर पकडुन त्यास त्यांचे नांव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे । नाव सागर राजेंद्र पवार, वय ३२ वर्षे, रा. श्लोक अर्पा. फलॅट नं.४०१, न-हे भुमकर चौक पुणे असे असल्याचे सांगितले.

त्यास पकडल्यापासुन तो सतत त्याचे कमरेच्या उजव्या बाजुला हात लावुन काहीतरी लपवत असल्याचे दिसले. त्यास कमरेला वारंवार का, हात लावत आहे? याबाबत पोलीसांनी विचारणा करता तो उडवाउडवीचे । उत्तरे देवु लागला. तेव्हा त्याची झडती घेता त्याचे डाव्या बाजुच्या कमरेला पॅन्टच्या आत खोवलेला एक देशी बनावटीचे पिस्टल व मागील बाजुस खिशात प्लॅस्टिकच्या लहान आकाराच्या पिशवीत जिवंत काडतुसे मिळुन आली सदरचा देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस बाळगण्याचा त्याचेकडे कायदेशीर परवाना आहे का? याबाबत त्याला विचारणा केली असता, त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याचे कब्जात मिळालेल्या देशी बनावटीचे पिस्टल व २ काडतुसे मिळुन आली आहे. सदर इसमाच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे पुणे। गुरन. १७८/२०२४. भारतीय हत्यार कायदा कलम. ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम. ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर इसमाच्या विरुध्द भारती विदयापीठ, नाशिक रोड, लष्कर, हवेली पोलीसठाणे येथे गुन्हे दाखल आहे.

वरिलप्रमाणे कामगिरी मा अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पूर्वे प्रादेशिक विभाग, मा.आर राजा, पोलीस उप आयुक्त साो परि.०५, मा. शाहुराव साळवे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, अमोल हिरवे, अभिजीत जाधव, विकास मरगळे, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, राहुल थोरात, | सुहास मोरे, शंशाक खाडे, आशिष गरुड, रोहित पाटील यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट