कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात महिलांविषयक तक्रारींचा तपास व निराकरणाच्या प्रगतीचा घेतला विशेष आढावा..

सह संपादक -रणजित मस्के
कोल्हापूर :


आज कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात महिलांविषयक तक्रारींच्या तपास व निराकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत महिला तक्रारींच्या नोंदणीची सुस्पष्ट प्रक्रिया, प्रत्येक प्रकरणाचा वेळेत व निष्पक्ष तपास, संबंधित यंत्रणांमधील समन्वय वाढवण्याचे उपाय, संवेदनशील प्रकरणांवर तातडीची कारवाई या विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीत पोलीस अधीक्षक मा. योगेश कुमार, होम डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुवर्णा पत्की, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.