कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट कडून कार्यकर्ता प्रशिक्षण संपन्न

धाराशिव
प्रतिनिधी-अशोक कोकरे




कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट या सामाजिक संस्थेकडून 2020 पासून तुळजापूरातील 22 गावात सर्वागीण ग्रामीण विकास कार्यक्रम या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी सूरू आहे. या प्रकल्पाचे मुळमंत्र म्हणजे या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेले ग्राम विकास समित्या होत. प्रत्येक गावात 20 सदस्यीय समिती तयार करण्यात आले आहेत. या समित्यांमध्ये सामाजिक समतोल राखण्यात आलेला आहे. या समितीतील प्रमुख पदाधिका-यांचे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये आज प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर चे नुतन संचालक मा. डाॅ. बाळ राक्षसे होते. युनिसेफचे महाराष्ट्र राज्य माजी प्रकल्प समन्वयक मा. सर्फराज काझी प्रशिक्षक म्हणून उपलब्ध झाले होते. आपल्या उद्घाटनीय भाषणात डाॅ. बाळ राक्षसे म्हणाले कि कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट चे प्रकल्पातील काम समाजात आदर्शवत आहे. समाजकार्य मानवाचे गुणधर्म आहे आणि आयुष्यात सर्वोत्कृष्ट होण्यापेक्षा सर्वोपयोगी जीवन जगण्याचा प्रत्येकानी प्रयत्न करावे असे आवाहन केले. प्रशिक्षकांनी महत्वाच्या तीन मुद्द्यांना केंद्रीत करून प्रशिक्षण पार पडला.प्रकल्प शुभारंभात अंतीम परिणाम पाहण्याची दूरदृष्टी असणारे निस्वार्थी ग्राम विकास समितीचे सदस्य. प्रकल्प सूरू असताना सुक्ष्म निरिक्षण करून समाजातील शेवटचा घटक जागा करणारी गाव समिती आणि प्रकल्प संपल्यावर गरीबांच्या शाश्वत विकासाची जबाबदारी घेणारी समीती. प्रशिक्षण अत्यंत मनोरंजक आणि प्रशिक्षणार्थिंच्या सहभागातून परिणाम कारक झाले. कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट चे प्रकल्प व्यवस्थापक डाॅ. दयानंद वाघमारे यांनी या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. मनोहर दावणे, स्नेहल पाटील, दिनेश भोसले, रोहित चव्हाण, प्रदीप कांबळे, ज्ञानेश्वर बनसोडे , जीवन मिसाळ , गंगा नन्नवरे गणेश लोहार यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी विशेष कष्ट घेतले.