अपहरण केलेल्या महिलेला डांबून ठेऊन वारंवार अत्याचार करणाऱ्या 4 आरोपीना रसायनी पोलीसांनी ठोकल्या बेड्या एक फरार……

रायगड : रसायनी येथील गुळसुंदे गावात एका घरात पिडित महिलेला 15 दिवस डांबून ठेवण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे की रसायनी येथे सावळे गावात राहणारा राजेश बाळाराम कुरंगळे या आरोपीने पिडीत महिलेचे अश्लिल व्हिडीओ तयार केले होते. तर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला वारंवार देत तिच्या मनाविरुद्ध संबंध ठेवून अत्याचार करत होता.
तसेच या प्रकरणात राजेश कुरंगळे याला त्याच्या काही साथीदारांनी महिलेला अपहरण करण्यास मदत केली असल्याची माहिती यावेळी त्यानी रसायनी पोलिसांनी दिली.
माहितीनुसार रसायनी पोलिसांनी राजेश बाळाराम कुरंगळे (वय 33) या मुख्य आरोपी सह, स्वप्निल माणिक जोशी (वय 32), निलेश सुरेश माठल (वय 21), भरत नामदेव जांभळे (वय 33)यांना ताब्यात घेतले असून 5 वा आरोपी आश्विन हा फरार असल्याचं सांगितलं आहे.
आता या आरोपींविरुद्ध रसायनी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 376, 363, 341, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डि.गुंड हे अधिक तपास करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com