अपहरण करून खुनाचा प्रयत्न करून फरार झालेला कुख्यात सराईत गुन्हेगार जेरबंद..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे :
त्याचेकडून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतूस हस्तगत केले स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कारवाई
मंचर येथील डॉक्टरचे अपहरण करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत खंडणी मागितल्या प्रकरणी मंचर पो स्टे गु.र.नं. ०६/२०२५ भा.न्याय.सं.क. १०९, १४०(३), ३०८, ३५२, ३५१(२), ११५(२).६१(२), ३(५) सह आर्म अॅक्ट कलम ३,२५,२७ अन्वये दि. ०४/०१/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील व्यवसायाने डॉक्टर असलेले यातील फिर्यादी नामे कैलास रघुनाथ काळे रा. मंचर ता. आंबेगाव, जि.पुणे हे त्यांचेकडील मोटार सायकलवरून पेठ ते मंचर असे जात अतसाना आरोपींनी त्यांचेकडील सफारी या चारचाकी वाहनाची मोटार सायकलला धडक देवून डॉक्टरांना खाली पाडले व त्यांचे अपहरण करून त्यांना निघोटवाडी परिसरात नेवून जबर मारहाण करून २० लाख रूपये खंडणीची मागणी केली. एक लाख रूपये खंडणीची रक्कम घेवून आरोपी पैकी एकाने डॉक्टरांना जीवे मारण्याचे उद्देशाने गावठी पिस्तुलमधून गोळी फायर केली व त्यानंतर डॉक्टरांना पुणे-नाशिक हायवे रोडचे कडेला पेट घाटाचे जवळ सोडून दिले होते.
सदरचा गुन्हा गंभीर असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साो पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणून सराईत मुख्य आरोपी पवन सुधीर थोरात रा. मंचर ता आंबेगाव जि पुणे यास अटक केली होती. सदर गुन्हयात विशेष सहभाग असलेला कुख्यात सराईत आरोपी नामे प्रविण ऊर्फ डॉलर सिताराम ओव्हाळ हा गुन्हा घडलेपासून फरार होता. सदरचा आरोपी वाचेवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म अॅक्ट वा सारखे गुन्हे दाखल असल्याने तो पोलीस अटकेपासून स्वतःला वाचवित होता. सदरचा कुख्यात पाहिजे आरोपी हा आळेफाटा एस.टी. स्टैंड परिसरात येणार असल्याची माहिती स्था.गु.शा.चे पो.कॉ. अक्षय नवले यांना मिळाली होती, त्या माहितीचे आधारे दि. १५/०३/२०२५ रोजी आळेफाटा एस.टी. स्टैंड परिसरातून त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असता फरार आरोपी प्रविण ऊर्फ डॉलर सिताराम ओव्हाळ, वय ३२ वर्षे, रा. वाळद ता. खेड जि पुणे याचे अंगझडतीत त्याचे कंबरेला एक गावठी पिस्तुल व मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतुस असा एकूण ५१,०००/- रू किं.चा मुद्देमाल मिळून
आला आहे. सदर आरोपीवर आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नोंद ६१/२०२५ भा.ह.का. ३.२५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे साो. पुणे विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार दिपक साबळे, अक्षय नवले, संदिप वारे, राजू मोमीण, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर यांनी केली असून पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन करत आहे.