विवाहितेचे अपहरण व बलात्कार : तासगाव येथील तरुणास १० वर्षे शिक्षा…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :– विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल पांडुरंग श्रीरंग केंगार (वय २६ रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव) याला १० वर्ष सक्तमजरी व ५ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश श्रीमती. एम. एस. काकडे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन नरवाडकर यांनी काम पाहिले.

न्यायालयाने त्याला भा.दं.वि.सं. कलम ३७६ (२) (एन), अन्वये दोषी धरुन १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस ज्यादा साधी कैद, तसेच कलम ३६३ अन्वये दोषी धरुन १ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ८ दिवस साधी कैद , कलम ३४२ अन्वये ३ महिने साधी कैद्याची शिक्षा सुनावली आहे. त्याने सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

खटल्याची पार्श्वभूमी अशी- आरोपी व पीडित महिला एकाच परिसरात राहत होते. दि.२६ ऑक्टोबर २०२० रोजी पिडीत महिला जवळच्या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी पांडुरंग केंगार हा मोटरसायकल वरुन तिथे आला व त्या महिलेचे तोंड दाबून जबरदस्तीने गाडीवर बसवून वंजारवाडी येथील निर्जन स्थळावर असलेले एका घरामध्ये घेऊन गेला. तिथे त्याने त्या महिलेवर बलात्कार केला. दि. २६ ते ३० या काळात त्यांनी त्या महिलेवर वारंवार अत्याचार केले. याप्रकरणी पीडित महिलेने तासगाव पोलिसात पांडुरंग केंगार याच्याविरुद्ध फिर्याद दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तपास करून पांडुरंग विरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले.सरकार पक्षाला तासगाव पोलीस ठाण्याचे रवींद्र माळकर, पैरवी कक्षातील सुनित आवळे, रेखा खोत, अर्चना कांबळे यांनी मदत केली. साक्षीदारांच्या साक्षी, उपलब्ध पुरावे व सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्याय निवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट