अपहरण व खुनाचे गंभीर गुन्हयात सुमारे ५ महिन्यांपासून फरारी आरोपी अविनाश धोडी पालघर पोलीसांच्या जाळ्यात

0
Spread the love

उप संपादक – मंगेश उईके

पालघर .

घोलवड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ११/२०२५ बीएनएस कलम १४० (३), १४० (१), १४२, ३५१ (२), ३ (५), ६१ (२) (अ), १०३ (१), २३८ (अ) प्रमाणे दि. २७/०१/२०२५ रोजी दाखल आहे.

सदर गुन्हयात फिर्यादीचे वडील श्री. अशोक रमण धोडी, वय ५२ वर्षे, रा. वेवजी काटील पाडा ता. तलासरी, जि. पालघर यांनी अविनाश रमण धोडी याची घरपट्टी रद्द करण्यासाठी वेवजी ग्रामपंचायत येथे अर्ज दिला होता व त्यांचेत जमीनीचे कारणावरुन वाद होता. त्यावरुन आरोपी अविनाश धोडी याने मनात राग धरुन यातील मयत श्री. अशोक रमण धोडी हे दि. १९/०१/२०२५ रोजी १६.०० वा. चे सुमारास डहाणू येथुन त्यांचे घरी जात असतांना, मौजे वेवजी घाटातील हिलझील डोंगराचे वळणावर आरोपी अविनाश रमण थोडी याने त्याचे इतर साथीदारांसह आपसांत संगनमत करुन, अशोक रमण धोडी यांची कार अडवून, दमदाटी करून गाडीसह अशोक धोडी यांचे अपहरण करुन, त्यांचा खून करुन, पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह व कार असे सरीगांम वाडीयापाडा ता. उमरगांव जि. वलसाड, गुजरात येथील पाण्याने भरलेल्या खदाणीत टाकून दिले होते. सदर गुन्हयात यापूर्वी एकुण ०५ आरोपी अटक करण्यात आलेले असुन, गुन्हयातील मुख्य आरोपी अविनाश रमण धोडी व इतर ०३ साथीदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासून फरारी होते.

पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी सदर गंभीर गुन्हयाची योग्य ती दखल घेवुन, पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांचे नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करुन, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखा पालघर कडील विशेष पथकाने नमुद आरोपी घोलवड, उमरगांव, वापी (गुजरात), दिव दमण, सिलवासा, इंदौर, राजस्थान इत्यादी परिसरात शोध घेवुन बातमीदारांचे मार्फत माहिती मिळवुन सदर गुन्हयातील आरोपी अविनाश रमण धोडी, वय रा. वेवजी ता. तलासरी जि. पालघर यास दि. ०८/०६/२०२५ रोजी ०३.२५ वा. मौजे मोरखल, सेलवास येथुन ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती अंकिता कणसे, उप विभागीय पोलीस अधिकारी, डहाणू या करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग, श्रीमती अंकिता कणसे, श्री. प्रदिप पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, सपोनि/श्री. अनिल व्हटकर, पोउनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोउनि/रोहीत खोत, श्रे. पोउनि/राजेश वाघ, श्रे. पोउनि/सुनिल नलावडे, पोहवा/दिपक राऊत, पोहवा /संदिप सुर्यवंशी, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा /कैलास पाटील, पोहवा/दिनेश गायकवाड, पोहवा/भगवान आव्हाड, पोहवा/कपिल नेमाडे, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/संजय धांगडा, पोना/कल्याण केंगार, पोअमं/प्रशांत निकम, पोअमं/विशाल कडव, पोअमं/विशाल नांगरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट