खंजीर बाळगणा-या आरोपी अभिषेक धनवडेला 14 चोरीच्या मोटार सायकली केले जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

जालना

जिल्हयातील व बाहेरील 13 चोरीचे गुन्हे उघडकीस परतुर पोलीसांची कारवाई

दिनांक 02/06/2025 रोजी पोलीस स्टेशन परतुर अंतर्गत वादुर दुरक्षेत्र हददीतुन HF डिलक्स मोसा क्रमांक MH-21-BJ-6311 ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. सदर चोरीची मोटार सायकल आरडा तोलाजी गावातील एका व्यक्तीकडे असल्याची माहीती परतुर पोलीसांना मिळाली. त्यावरुन सापळा रचुन इसम नामे अभिषेक प्रल्हाद धनवडे रा. आरडा तोलाजी, ता. मंठा जि. जालना यास ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता त्याचे ताब्यात धारधार पात्याचे घातक खंजीर मिळुन आले. तसेच एक स्प्लेंडर कंपनीची विनाक्रमांकाची मोटार सायकल मिळुन आली. त्यास विचारपुस करता सुरुवातीस त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलीसांनी पोलीस खाक्या दाखविताच त्याने त्याचे दोन साथीदारसह सदरची मिळुन मोटार सायकल मौजपुरी हददीतुन चोरी करुन आणल्याचे सांगीतले. त्याचा एक साथीदार अमोल गणेश चव्हाण रा. आरडा तोलाजी यास ताब्यात घेवुन त्यांना अटक करुन 03 दिवस पोलीस कोठडी दरम्याण त्यांच्याकडुन जालना, परभणी, बुलडाणा जिल्हयातुन वेगवेगळया ठिकाणावरुन चोरुन आणलेल्या एकुण 14 मोटार सायकली किंमती अंदाजे 12,30,000/- रुपयेच्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय शस्त्र अधिनीयमान्वये वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सफौ / नंदू खंदारे करीत असुन आरोपीकडून आणखी चोरीच्या मोटार सायकल मिळुन येण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या मोसाचे वर्णन येणेप्रमाणे –

अ.क्र. चोरीस गेलेल्या मोसा क्रमांक

  1. HF डिलक्स मोटार सायकल क्रमांक MH-21-BJ-6311
  2. HF डिलक्स मोटार सायकल क्रमांक MH-20-DN-0580
  3. होंडा डिलक्स् एच पी 125 मोटार सायकल

MH-21-BU-3223

  1. HF डिलक्स मोटार सायकल MH-21-BE-5456
  2. HF डिलक्स मोटार सायकल MH-21-BX-1833

बजाज प्लटीना मोटार सायकल MH-21-BS-4521

स्प्लेंडर प्ल्स मोटार सायकल क्रमांक MH-28-BU-2254

युनिकॉन मोटार सायकल क्रमांक MH-22-

AV-6552

स्प्लेंडर प्ल्स मोटार सायकल क्रमांक MH-22-BA-4784

  1. शाईन मोटार सायकल क्रमांक MH-22-AU-5024

दाखल गुन्हा व कलम

पोलीस स्टेशन परतुर जालना गुरनं 273/2025 कलम 303(2) बीएनएस

पोलीस स्टेशन परतुर जालना गुरनं 2025 कलम 303(2) बीएनएस

पोलीस ठाणे तालुका जालना गुरनं 294/2025 कलम 303(2) बीएनएस

पोलीस ठाणे तालुका जालना गुरनं 362/2025 कलम 303(2) बीएनएस

पोलीस ठाणे सेवली गुरनं 83/2024 कलम 303(2) बीएनएस

पोलीस स्टेशन मौजपुरी, जालना गुरनं- 282/2023 कलम 303(2) बीएनएस

पोलीस स्टेशन मौजपुरी, जालना गुरनं 151/2025 कलम 303(2) बीएनएस

पोलीस स्टेशन बामनी जि. परभणी गुरनं 72/2025 कलम 303(2) बीएनएस

पोलीस स्टेशन चारठाणा जि. परभणी गुरनं 93/2025 कलम 303(2) बीएनएस

पोलीस स्टेशन चारठाणा जि. परभणी गुरनं 56/2025 कलम 303(2) बीएनएस

  1. स्प्लेंडर + मोटार सायकल क्रमांक MH-37-

पोलीस स्टेशन बामनी जि. परभणी गुरनं 84/2025 कलम 303(2) बीएनएस

AG-1967

पोलीस स्टेशन सिंदखेड राजा. बुलडाणा गुरनं 68/2025 कलम 303(3) बीएनएस

  1. एक विनाक्रमांकाची पल्स मोटार सायकल जिचा चेसीस क्रमांक

MD2B64BX4LWH21915

  1. स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक MH-

28-BV-4039

पोलीस स्टेशन किनगाव राजा बुलडाणा गुरनं 108/2025 कलम 303(2) बीएनएस

  1. एक विनाक्रर्माकाची स्प्लेंडर + मोटार सायकल

सदर मिळुन आलेल्या चोरीच्या मोटार सायकलमुळे 13 गुन्हे उघडकीस आले असून कोणाची मोटार सायकल चोरीस गेली असल्यास परतुर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधा तसेच चोरीच्या मोटार सायकल कोणीही विकत घेवु नये त्याच्यावर सुध्दा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे असे आव्हान पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे पोस्टे परतुर यांनी केले आहे.

सदरची कारवाई ही. मा. प्रभारी पोलीस अधिक्षक, श्री. आयुष नोपानी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर श्री. दादाहरी चौरे, पोलीस निरीक्षक परतुर श्री. मच्छींद्र सुरवसे, पोउपनि अमोल रावते, सफौ नंदु खंदारे, पोहेकों/833 किरण चव्हाण, पोकॉ/322 दिपक आढे, पोकों/589 अच्युत चव्हाण, पोकों/731 नरेद्र चव्हाण, पोअं/1603 ज्ञानेश्वर वाघ, पोकों/1626 सुनिल इलग, पोअं/508 वंदन पवार आदीनी केलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट