‘खुनाच्या गुन्हयातील आरोपीत ०२ तासात गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण कडुन जेरबंद’

0
Spread the love

टिळकनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ९३ / २०२३ भा.दंb.वि. कलम ३०२ या गुन्हयातील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे रमेश वेलचामी (तेवर) हा गुन्हा केल्यानंतर धारावी मुंबई तसेच मुळगांवी तामिळनाडु राज्यात पळुन जाणार असल्याची शक्यता गृहित घरून आम्ही त्यानुसार नमुद पाहिजे आरोपींचे छायाचित्र प्राप्त करून घटकातील अधिकारी / अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना योग्य सुचना देवुन एक पथक धारावी मुंबई, तसेच दोन पथक कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफार्म परिसरात आरोपीचे शोधार्थ घेण्या करीता रवाना केले होते. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोहवा / प्रशांत वानखेडे, पोहवा / प्रविणकुमार जाधव, पोलीस शिपाई गुरूनाथ जरग या पथकाने प्राप्त छायाचित्र, मोबाईल नंबर तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे नमुद संशयीत नामे रमेश व्हि. (रमेश वेलचामी तेवर) वय २८ वर्षे रा. शिवाजी शेलार यांचे घराचे शेजारी, कांचनगांव, खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व, कल्याण यास कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफार्म क्र. ०६ चे मुंबई दिशेकडील ब्रिज जवळून पथकातील पोहवा प्रशांत वानखेडे यांनी ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारणा करता तो उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याचेवर वाजवी संशय बळावला. त्यामुळे त्याची अंगझडतीत घेता रेल्वे गाडी क्र. २२१५७ चैन्नई एग्मोर या जलद गाडीचे ई तिकीट पीएनआर क्र. ८७०२८५७२९५ हे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण – मानपाडा येथील कार्यालयात आणुन त्यांच्याकडे चौकशीत त्याने त्याचा मेहुना नामे मारीकन्नी रामास्वामी (तेवर) रा. शिवाजी शेलार यांचे घराचे शेजारी, कांचनगांव, खंबाळपाडा, डोंबिवली, कल्याण यास रागाचे भरात चाकुने भोसकुन / हल्ला करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले असुन रात्रौ चैन्नई एग्मोर रेल्वेने मुळगांवी पळुन जाणार असल्याची कबूली दिल्याने त्यास पुढील कारवाई करीता टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवाली करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. जयजित सिंग, मा. पोलीस सह आयुक्त श्री. दत्तात्रय कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), मा. पोलीस उप आयुक्त श्री शिवराज पाटील (गुन्हे), मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. निलेश सोनावणे गुन्हे शोध १ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर शिरसाठ, पोलीस निरीक्षक शशांक शेळके व त्याचे सहकारी पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहा.पो.उप निरी. / संजय माळी, पोहवा / प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव पोहवा / विकास माळी (मानपाडा पोलीस ठाणे), रमाकांत पाटील, किशोर पाटील, बापुराव जाधव, विश्वास माने, उल्हास खंडारे, बालाजी शिंदे, पोहवा / गोरखनाथ पोटे, पोहवा / विलास कडू, पोशि/ गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, चापोशि/ राहुल ईशी सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी केलेली आहे.

उपसंपादक – रणजित मस्के

ठाणे – मानपाडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट