परिमंडळ ५ मधील लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीसजन्मठेपेची शिक्षा

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे :थोडक्यात हकिकत :-यातील आरोपी सचिन अंबादास खोत हा मयत अंबादास दिगंबर खोत यांचा मुलगा आहे. सदर घटना ही मौजे शिंदवणे गावाचे हद्दीत, कडाचा मळा येथे सोपान कांचन यांचा जमीन गट क्रमांक ३८० मधील विहीरीच्या जवळ, वांधालगत ता. हवेली, जि. पुणे येथे दिनांक २९/१०/२०१४ रोजी दुपारी १२:०० ते १२:३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. यातील मयत अंबादास दिगंबर खोत, आरोपी सचिन अंबादास खोत, वय २७ वर्षे, रा. ईरीगेशन कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, मयताची पत्नी ज्योती व आरोपीचा मुलगा असे एकत्र राहण्यास असताना मयत याने आरोपीचे पत्नीचा वाईट हेतूने हात धरुन घरात अंडरवेअरवर राहून तिस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन आरोपीस “तू रात्रीचे वेळी शेतात पाणी धरण्यास जा, मी ज्योतीचे खोलीत झोपतो” असे म्हणाल्याच्या तसेच त्याचे पत्नीवर सतत वाईट नजर ठेवल्याचा राग मनात धरुन आरोपी सचिन अंबादास खोत याने त्याचे वडिल व यातील मयत अंबादास दिगंबर खोत यांना ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करुन जिवे ठार मारल्याने लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ३९९/२०१४ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपाससदर गुन्हयाचा तपास श्री. रणजितसिंग परदेशी, सहा. पोलीस निरीक्षक यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. १०९/२०१५ असा आहे.शिक्षावरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक ०१/०२/२०२५ रोजी सश्रम कारावासासह जन्मठेप व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.कामगिरीसरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. नामदेव तरळगट्टी, कोर्ट पैरवी श्रीमती ललिता कानवडे, यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पोहवा २१४८ ललिता कानवडे व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि श्री. रणजितसिंग परदेशी यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट