खोपोली पोलीस ठाणे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत श्री गुरुदास कॅफे या हॉटेलमील दाखल गुन्हयातील आरोपस गुरुग्राम-हरियाणा ताब्यात घेऊन गुन्हयातील अपहारित रक्कम 11,50,000/- रुपये हस्तगत केले हस्तगत..

0
Spread the love

खोपोली

सह संपादक -रणजित मस्के

खोपोली पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मौजे दहिवली गावचे हद्यीतील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत असलेल्या श्री. गुरुदास कॅफे या हॉटेलमध्ये मॅनेजर या पदावर काम करणारा इसम नामे सुमित झल्लर प्रसाद पाण्डेय, रा.ऐकोनी, पो. कोन्धियारा, ता.करछना, जि. इलाहाबाद-उत्तरप्रदेश याने दिनांक 03.02.2025 रोजी सदर हॉटेलमध्ये यापुर्वी जमा असलेली रोख रक्कम 11,50,000/- रुपये इतकी दुपारी 12.00 वाजताचे सुमारास श्री. गुरुदास कॅफेचे मालक श्री. भास्कर महाबल शेट्टी, रा.येरवडा-पुणे यांचेकडे सुरक्षितरित्या देणेकामी स्वतःचे ताब्यात विश्वासाने घेवुन निघाला होता. परंतु सदर हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणुन काम करणारा इसम सुमित झल्लर प्रसाद पाण्डेय हा हॉटेलचे मुळ मालक यांचेकडे न जाता स्वतःचा अवाजवी व आर्थिक फायदा करुन घेण्याच्या इरादयाने वर नमुद रोख रक्कम घेवुन पसार झाला होता. त्यावरुन खोपोली पोलीस ठाणे येथे गुर.क्र.35/2025 भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 316 (4) प्रमाणे दिनांक 04.02.2025 रोजी 17.55 वाजता दखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्हयाच्या मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती आँचल दलाल, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. अभिजित शिवथरे, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. विक्रम कदम यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करुन तपासाबाबत सुचना दिल्या होत्या.

त्यानंतर सदर गुन्हयाचा तपास खोपोली पो.स्टे. व.पो.नि., श्री.शितल राउत यांनी पोहवा/सुजित माळी यांचे मदतीने सुरु केला. सर्वप्रथम गुन्हा घडल्यानंतर गुन्हयातील निष्पन्न आरोपीत याचा तांत्रीक पध्दतीचा वापर करुन त्याआधारे आरोपीत याचा छडा लावुन आरोपीत याचा गुरुग्राम-हरियाणा या ठिकाणी जावुन शोध घेतला असता तो लक्ष्मीगार्डन, पटौदी चौकी, शिवाजीनगर पोलीस ठाणे, गुरुग्राम-हरियाणा याठिकाणी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात यश आलेले असुन त्यास गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयाचे तपासादरम्यान अटक आरोपीत याचेकडुन गुन्हयात अपहारित केलेली रोख रक्कम 11,35,000/- रुपये एवढी हस्तगत करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी ही रायगड जिल्हयाच्या मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती आँचल दलाल, मा.अपर पोलीस अधीक्षक, श्री. अभिजित शिवथरे, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक श्री. शितल राउत, गुन्हयाचे तपासी अंमलदार पोहवा/1176 सुजित माळी, पोशि/812 प्रणित कळमकर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट