खोपोली व रायगड पोलीसांनी १०७ कोटींचे एम. डी. ड्रग्ज जप्त करुन ३ आरोपींच्या आवळल्या मुसक्या. ..

उपसंपादक-रणजित मस्के
खोपोली :-खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावुन आतमध्ये मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात असल्याबाबत खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली.
सदर गोपनीय माहीती ही वरीष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाईच्या अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना प्राप्त करुन उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापुर श्री. विक्रम कदम व खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत व खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी वरील नमुद कंपनीमध्ये कायदेशीर पद्धतीने छापा घातला.
दिनांक ०७/१२/२०२३ रोजी पोलीस पथकाने सदर ठिकाणी कंपनीत प्रवेश केल्यानंतर कंपनीचे चालक यांचेकडे सदर ठिकाणी रासायनिक पदार्थ निर्मिती करणेसाठी आवश्यक असणारा शासनाचा कोणताही वैध परवाना मिळुन आला नाही. त्या ठिकाणी उग्र वास येत असल्याचे व काही कच्चा माल, तसेच त्याचेवर प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री असेंबल केल्याचे दिसुन आले. यामध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियमातील तरतुदीप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आली. याबाबत तयार पक्का माल असलेली पावडर ही नार्को इन्स्पेक्शन कीट (Narco Inspection kit ) द्वारे तपासणी केली असता सदर तयार केलेला माल हा एम. डी. म्हणजेच मेफेड्रॉन (Mephedrone) असल्याचे निष्पन्न झाले.
कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल -
१. जप्त केलेला तयार मुद्देमाल – रु. १०६ कोटी ५० लाख किंमतीची एकुण ८५ किलो २०० ग्रॅम वजनाची एम. डी. पावडर
- जप्त केलेला तयार मुद्देमाल – रु. १५,३७,३७७/- किंतीची एम. डी. पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने
- जप्त केलेला तयार मुद्देमाल – रु.६५,००,०००/- किंमतीची रासायनिक प्रक्रीयेसाठी असेंबल केलेली साधन सामग्री

वरील सर्व मुद्देमालाची एकुण किंमत १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपये (अक्षरी रुपये एकशे सात कोटी तीस लाख सदतीस हजार तीनशे सत्याहत्तर मात्र) असुन सदर मुद्देमाल व मालमत्ता जप्त करून सील करण्यात आलेली आहे. वरील प्रमाणे केलेल्या कारवाईमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन सदर बेकायदेशीर कंपनी देखील सील करण्यात आली आहे.
सदर कारवाई मा. श्री. प्रविण पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परीक्षेत्र, मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, रायगड, मा. श्री. अतुल झेंडे, अपर पोलीस अधिक्षक, रायगड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापुर यांचे नेतृत्वाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत, सहा. पोलीस निरीक्षक श्री. हरेश काळसेकर, श्री. प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधाकर लहाने, श्री. अभिजीत व्हरांबळे, पोहवा / २०७२ राजेंद्र पाटील, पोहवा / २१३० सागर शेवते, पोहवा / १०८६ प्रसाद पाटील, मपोहवा / ५३ आर. एन. गायकवाड, पोना/२२७४ सतीष बांगर, पोना / ११३५ कुंभार, पोशि/ ५६६ आर. डी. चौगुले, पोशि/ ४५६ राम मासाळ, पोशि/ १८४९ प्रदीप खरात असे सहभागी झालेले होते.
पोलीस पथकाने सतत २४ तास मेहनत करून सदर कारवाई पुर्ण केली आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ३६४/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(c), २२ (c) सह कलम २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com