खेळामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते-जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर दि. ३० : नियमित खेळ खेळल्याने शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.



जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हानमाने, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांना विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्याला सामोरे जावे लागते. दिवसातील थोडा वेळ खेळासाठी काढला तर आपण विविध व्याधी पासून बचाव करू शकतो. शालेय विद्यार्थ्यांनी नियमित खेळाचा सराव केल्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव झळकेल असा विश्वासही जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखङ यांनी व्यक्त केला.