खंंडणीखोर बोगस पत्रकारवर नवी मुंबईत गुन्हा दाखल …

उपसंपादक – रणजित मस्के
कोपरखैरणे :
नवी मुंबई कोपरखैरणे पोलिसांनी एका बोगस पत्रकारावर खंडणी स्वरूपात घेतल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. या बोगस पत्रकाराला अटक करण्यात आले आहे.
एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचा एडिटर म्हणून नाव सांगणाऱ्या एका बोगस पत्रकाराने ते चालवीत असलेल्या नटराज बार अँड रेस्टॉरंटची चित्रफित जवळ असल्याचे सांगून ती चित्रफीत राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्याची धमकी दिली.तसेच, ऑनलाईन ३० हजार रुपये स्वीकारून आणि आणखी रकमेची मागणी करून ती रक्कम न दिल्यास पोलिसात तक्रार करून जीवे मारण्याची धमकी एका बोगस पत्रकारांनी दिली रक्कम होती.

यामध्ये राजेंद्र दशरथ साळुंखे, राजू छगन, पटेल जैन यांच्याशी एकमत होऊन राजेंद्र दशरथ साळुंखे याच्यामार्फत २० हजार खंडणी स्वरूपात रक्कम घेतल्याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी या बोगस पत्रकाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये राजेंद्र साळुंखे याला अटक केले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com