खंडणीची मागणी, मारहाण, दहशत निर्माण करून पळून गेलेला मोक्यातील आरोपी संदिप केंद्रे अखेर पुणे युनिट ४ कडून जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

पोलीस निरीक्षक युनिट-४ गुन्हे शाखा पुणे शहर श्री. अजय वाघमारे, यांना विमानतळ पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ४८१/२०२४, भा.न्या.स. कलम ३०८(४),१८९ (२),१९१ (२).१९१(३),१९०, ३५२,३५१(३), आर्म अॅक्ट कलम ४ (२५) क्रिमिनल लॉ अमेन्टमेन्ट कलम ७, सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) ( ), ३ (२), ३ (४) दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन दाखल गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवुन मिळून आल्यास कारवाई करणेचे आदेश मा. वरिष्ठांनी दिले होते.

दि.२९/०६/२०२५ रोजी वरिष्ठांच्या आदेशान्वये युनिट ४ चे पथक विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक, पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विनोद महाजन, नागेशसिंग कुंवर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सुमारे दहा महिन्यापूर्वी खंडणीची मागणी करुन मारहाण करुन, दहशत करुन पळून गेलेला संदीप गौतम केंदळे हा सिध्दार्थनगर कुर्जुवाडी, सोलापुर येथे राहत आहे. युनिट ४ कडील पथकास मिळालेल्या बातमी प्रमाणे तात्काळ कारवाई करणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अजय वाघमारे यांनी वरिष्ठांची परवानगी घेवुन कुर्जुवाडी सोलापुर येथे जाऊन स्थानिक पोलीसांची मदत घेवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या.

त्याप्रमाणे युनिट ४ चे पथकने कुर्जुवाडी सोलापुर येथे जावुन कुर्डवाडी पोलीस स्टेशन सोलापुर येथील स्थानिक पोलीसांचे मदतीने व गोपनीय माहितीच्या आधारे सिध्दार्थनगर कुर्जुवाडी सोलापुर येथुन आरोपीस ताब्यात घेवुन त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता संदीप गौतम केंदळे वय ३८ वर्षे रा. एसआरए बिल्डींग विमानगर पुणे व सिध्दार्थनगर कुर्डवाडी सोलापुर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास करता त्याने सुमारे दहा महिण्यापूर्वी एसआरए बिल्डींग जवळ, विमानगर पुणे येथे त्याने त्याचे साथीदारसह दाखल गुन्हयातील फिर्यादीकडे पैशाची मागणी करुन त्यास मारहाण केली असल्याचे कबुली दिली आहे. पुढील कारवाई मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर अति. कार्यभार (गुन्हे) श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २. श्री. राजेंद्र मुळीक, वांचे मार्गदर्शनाखाली युनिट ४. गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, पोलीस उप-निरीक्षक वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार प्रविण भालचीम, विनोद महाजन, संजय आढारी, नागेशसिंग कुंवर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट