खंडणी न दिल्याने डॉक्टरची दुचाकी जाळणारया ४ आरोपींना गोंदिया पोलीसांनी ठोकल्या बेडया…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– १२ तासांत आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी घेतले ताब्यात..
गोंदिया : शहराच्या कृष्णपुरा वॉर्डातील डॉ. लोकेश चतुर्भुज मोहणे (४३) यांना २० हजाराची खंडणी मागत त्यांची मोटारसायकल जाळणाऱ्या चार आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. ही कारवाई ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.
गोंदियाच्या कृष्णपुरा वॉर्डातील डॉ. लोकेश चतुर्भुज मौहणे यांना आरोपी राज ऊर्फ मारी सुशील जोसेफ (२०), मुकेश ऊर्फ डाव विनोद तांडेकर (३०), सुशांत रतन जाधव (३४), धर्मराज ऊर्फ धर्मादादी बावनकर (३२) रा. गौतमनगर, गोंदिया यांनी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी २० हजार रुपये खंडणीची मागणी केली. डॉ. लोकेश मोहणे यांनी २० हजार रुपये खंडणी देण्यास नकार दिला.
त्यामुळे आरोपींनी त्यांच्याजवळील मोटारसायकल जबरदस्तीने हिसकावून नेली. त्या मोटारसायकलला आग लावून पेटवून दिले. गोंदिया शहर पोलिसांनी चौघा आरोपींवर भादंविच्या कलम ३८४, न्यायालय, गोंदिया येथे हजर केले ४३५, ३४ अन्वये ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा असता न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत दाखल केला.
त्या आरोपींना ९ फेब्रुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रोजी अटक केली. तपास सहायक त्यामुळे आरोपींची जिल्हा मध्यवर्ती पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम कारागृह भंडारा येथे रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या
मार्गदर्शनाखाली डी बी. पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम, सहायक फौजदार घनश्याम थेर, पोलिस हवालदार जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपालसिह भाटिया, निशिकांत लॉदासे, दीपक रहांगडाले, सतीश शेंडे, प्रमोद चव्हाण, संतोष भेंडारकर, महिला पोलिस हवालदार रिना चौहान, पोलिस शिपाई अशोक रहांगडाले, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com