रेल्वे प्रवासी व महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने, खाकीतील सखी, सायबर क्राईम व अनैतिक मानवी वाहतूक याबद्दल जनजागृती…!

उपसंपादक : मंगेश उईके
वसई.
दिनांक 02/01/2025 रोजी 17:30 वा.ते 18:00 वा.पर्यंत *Commuting Policing अंतर्गत* वसईरोड रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील * वसई रेल्वे स्थानक ते नालासोपारा रेल्वे स्थानक दरम्यान लोकल गाडीमध्ये रेल्वे प्रवासी व *महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सायबर क्राईम, खाकीतील सखी व अनैतिक मानवी वाहतूक याबद्दल जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमावेळी *खाकितील सखी व कोटो ॲप* बाबत माहिती देऊन पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. *1) सायबर क्राईम कशा पद्धतीने घडतात व त्याबाबत दक्षता ” याबाबत जनजागृती करण्यात आली आहे* *2) अनैतिक मानवी वाहतूक (तस्करी) यासारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली* *3) मोबाईल फोन चोरी, किंमती व मौल्यवान वस्तू चोरी इ. गुन्ह्यांबाबत उपस्थित रेल्वे प्रवासी नागरीक व महिला प्रवासी यांना प्रबोधन करण्यात आले.* *4) महिलांच्या सुरक्षेकरीता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी महिलांकरीता राखीव डब्यांमध्ये रेल्वे पोलीसांकडुन सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत*. *5) महिला प्रवाशांनी महिलांकरीता राखीव असलेल्या डब्यातुनच प्रवास करावा.* *6) महिलांनी एकटे राखीव डब्यातुन प्रवास करतांना सुरक्षा कर्मचारी डब्यामध्ये आहे यांची खात्री करावी. सुरक्षा कर्मचारी नसल्यास, प्रवाशी असलेल्या डब्यातुन प्रवास करावा.* *7) रेल्वे स्टेशन अथवा रेल्वे प्रवासात कोणत्याही प्रकारची छेडछाडीची घटना होत असल्यास त्याची माहिती तात्काळ कर्तव्यावरील पोलीस अंमलदार अथवा रेल्वे पोलीस हेल्पलाईन क्र. 1512 यांना कळवावी.* *8) लोकल गाडयांमध्ये चढतांना अथवा उतरतांना व प्रवासादरम्यान आपला मोबाईल, सॅगबॅग व इतर मौल्यवान वस्तुंवर लक्ष द्यावे.* *09)लोकल मध्ये चढतांना अथवा उतरतांना आपल्या जवळील सॅगबॅग पाठीवर न लावता समोर धरावी जेणेकरुन चोरांना चोरी करण्याची संधी मिळणार नाही.* *10) प्रवासादरम्यान रॅकवर ठेवलेली सॅगबॅग व इतर सामान वारंवार चेक करुन रॅकवर असल्याची खात्री करावी.**11) प्रवासादरम्यान दरवाजात लटकुन प्रवास करु नये त्यामुळे जिवीतास तसेच मालमत्तेस धोका होऊ शकतो.* सदर कार्यक्रम वसईरोड रेल्वे पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक.अनघा सातवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक .चंदे, व 02 महिला पोलीस अंमलदार, 01 पोलीस अंमलदार तसेच 15 ते 20 रेल्वे प्रवासी असे हजर होते.