खडकवासला धरणात सिनेस्टाईल थ पळून जाणाऱ्या दारु विक्रेत्याचा पोहत पाठलाग करून Psi पडळकर यांनी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक- रणजित मस्के
पुणे:– पुणे-पानशेत रस्त्यावरील (Pune Panshet Road) ओसाडे येथील खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) तीरावर बेकायदेशीर दारु विक्रीचा धंदा सुरु असल्याची माहिती वेल्हे पोलिसांना (Velhe Police) मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी धाड टाकली. त्यावेळी मुद्देमाल सोडून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उडी मारुन पलायन करणाऱ्या सराईत दारु विक्रेत्याला पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर (PSI Appasaheb Padalkar) यांनी अंगावरील कपड्यानिशी पोहत पाठलाग करुन गजाआड केले.
पाणलोट क्षेत्रात आरोपी आणि पोलीस यांच्या तब्बल अर्धा-पाऊण तास थरारनाट्य सुरु होते. हे थरारनाट्य पाहून परिसरातील नागरिक देखील अचंबित झाले. पडळकर यांच्या साहसी कामगारिचे नागरिकांनी कौतुक केले आहे. अभिमन्यू ईश्वर नानावत (रा. ओसाडे ता. राजगड) असे अटक केलेल्या दारु विक्रेत्याचे नाव असून त्याच्यावर वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ओसाडे येथील धरणतीरावर राजरोसपणे बेकायदा दारु विक्री
करणाऱ्या दारु धंद्यावर वेल्हे पोलिसांनी शनिवारी (दि.11) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धाड टाकली. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी नानावत याने खडकवासला धरणाच्या पाणलोटात उडी मारली. तो धरणात पोहत पलीकडील सांगरुण गावच्या तीराकडे पळून चालला होता. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक पडळकर यांनी अंगावरील कपड्यांसह धरणात उडी
मारली. त्यांनी पोहत जाऊन नानावत याला धरणाच्या मध्यभागी पकडले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारु धंद्यावर पुणे ग्रामीण पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी मोहिम राबवण्यात येत आहे. असे असले तरी ओसाडे येथे धरणाच्या तीरावर आडबाजूला राजरोसपणे गावठी दारु विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर, सहायक पोलीस फौजदार राजाराम होले, पोलीस अंमलदार पंकज मोघे, मयूर जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com