खा. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उच्चारलेल्या आक्षेपार्ह शब्दांबाबत त्यांना बडतर्फ करण्याची राज्यपाल श्री. भगत सिंह कोशयारीकडे राष्ट्रवादी पार्टी तर्फे निवेदन…

प्रतिनिधी-दिप्ती भोगल
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.जयंत राजाराम पाटील यांच्या हस्ते दिनांक.- ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी महामहिम राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्र राज्य याना एक निवेदन देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फूले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथली माती, इथली संस्कृती आणि परंपरा ही आईसमान समजली जाते. स्त्रित्वाचा आदर करून स्त्री सन्मानाचा पुरस्कार करणारा महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीदेवी फले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि माता रमाईच्या लेकींचा महाराष्ट्र म्हणून अभिमानाने गौरविला जातो. परंतु या आदर्शवत स्त्रियांच्या संस्कारांना काळिमा फासण्याचं काम आज महाराष्ट्रात झालं आहे..

पवित्र अशा संविधानाची शपथ घेऊन मंत्री म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे विद्यमान कृषिमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल उच्चारलेले आक्षेपार्ह शब्द व केलेले वक्तव्य याचा आम्ही जाहीरपणे तीव्र शब्दात निषेध करतो. एका महिलेला अशाप्रकारे शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या एका जबाबदारीच्या पदावर राहण्याचा कुठलाही लाक्षणिक अधिकार नाही. तेव्हा महामहिम राज्यपाल महोदय आमची विनंती आहे की, सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासून स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या कृषिमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांना तातडीने बडतर्फ करावे. आपण महाराष्ट्राच्या लेकींना नक्की न्याय मिळवून द्याल याची मला खात्री आहे.
असे निवेदन देण्यात आले.

यावेळी श्री हसन मुश्रीफ ,दिलीप वळसे पाटील,जयंत पाटील,
राखीताई जाधव,नरेद्र राणे,
महेंद्र पानसरे,रुपेश खांडके,
सोहेल सुभेदार,अदिती नलावडे,उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com