पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या हस्ते केशोरी पोलीस स्टेशन च्या “दिनदर्शिका 2024” चे विमोचन….

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :

पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांचे संकल्पनेतून, आणि अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी श्री. संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली अतीदुर्गम नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या हिताकरिता " पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून " विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उपक्रम राबविले जात आहेत.... त्याच्याच एक भाग म्हणून जनतेला "पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या " माध्यमातून केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत 2023 मध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती व्हावी या उद्देशाने केशोरी पोलीस स्टेशनने पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत "सचित्र दिनदर्शिका 2024" तयार केलेली आहे...
या दिनदर्शिकेचे विमोचन "कॉन्फरन्स हॉल" पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, यांच्या हस्ते करण्यात आले... यावेळी प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) चानपूरकर मॅडम, पो. नि . प्रताप भोसले, दिनेश लबडे, बुराडे, केशोरी ठाणेदार सोमनाथ कदम, पो.उप.नि. हत्तीमारे तसेच कार्यालयातील अधिकारी- अंमलदार उपस्थित होते...
या दिनदर्शिकेमध्ये केशोरी पोलीस स्टेशनने दादालोरा खिडकी योजने अंतर्गत केलेल्या कामगिरी ची सचित्र माहिती देण्यात आलेली आहे...
सदरची दिनदर्शिका मा. श्री. निखिल पिंगळे पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ कदम, पो.उप.नि प्रताप बाजड, पोहवा. सुशिल रामटेके, राहुल चिचमलकर, मपोहवा. पुनम हरिणखेडे यांनी अतिशय उत्कृष्टपणे बनवली आहे....

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com