कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील झालेल्या खुनीना जन्मठेपेची शिक्षा..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली ;

कवठेमहांकाळ पोलीस ठाणे, जिल्हा सांगली गुन्हा रजि.न.287/ 2017 IPC 302 वगैरे प्रमाणे दिनांक 2/12/2017 रोजी गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, कवठे महांकाळ पोलीस ठाणे हद्दीतील अग्रण,धुळगाव या गावात दिनांक 01/12/2017 रोजी यल्लमा देवीचे यात्रेनिमित्त तमाशा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर वेळी यातील 7 आरोपींनी गोंधळ घातला होता, म्हणून फिर्यादी यांच्या मुलाने कमिटी कडे तक्रार केली होती. ही तक्रार केल्याचा राग मनात धरून नमूद आरोपींनी फिर्यादी यांचे मुलास अडवून गुप्ती,कुकरी व काठ्या या हत्यारांनी वार करून जीवे ठार मारले होते.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन police inspector श्री.राजन माने, नेम, स्थानिक गुन्हे शाखा,सांगली यांनी पूर्ण करून गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर तपासामध्ये, HC सागर पाटील व पवार यांनी मदत केली होती.
सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालय सांगली येथे झाली असून मा.न्यायालयाने दिनांक 07/01/2025 रोजी सदर खटल्याचा निकाल जाहीर केला आहे. त्यामधे 7 पैकी 5 आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट