भाईंदरमध्ये काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-१ ने १६.७१ लाखांचे मोबाईल, डंपर चोरणाऱ्यांना दिल्ली, परभणीमधुन केली अटकअटक..

उपसंपादक-रणजित मस्के
मिरा रोड :– १६ लाख ७१ हजारांचे मोबाईल व डंपर चोरणाऱ्यांना दिल्ली व परभणी येथे अटक करण्यात आली.
ही कारवाई मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष १ च्या पथकाने केली. या कारवाईत १४ लाख ५६ हजार ३०० रुपयांचे २२ मोबाईल हस्तगत करण्यात आले.
तसेच चोरलेला डंपर जालना येथून जप्त केला. डंपर चोरणारा अपघातात जखमी झाल्याने त्याच्यावर परभणीमध्ये उपचार सुरू आहेत.
२० मार्च २०२४ रोजी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० च्या दरम्यान चिराग जगदीश अनडा (वय ३६ वर्षे) यांचा जे.जे. मोबाईल शॉप, ०१ अप्लेश बिल्डींग, खाऊ गल्ली स्टेशन रोड, भाईंदर पश्चिम येथील दुकानाचे ग्रील व प्लाय तोडून चोरांनी १६ लाख ७१ हजार ३०० रुपयांचे मोबाईल पळवले. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात (गुन्हा रजी. नं. १३०/२०२४) भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, १२ मार्च २०२४ रोजी भोलानगर जवळ, उत्तन ते भाईंदर पश्चिम येथुन सुरेश त्रिंबक मंजुरकर (वय ३४) यांचा डम्पर (एम.एच./०४/सीयु/९९०७) चोरीला गेला. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात (गु.र. नं. ११२/२०२४ भादंवि कलम ३७९) नुसाक गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा कक्ष १ चे पथक करू लागले. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच खबऱ्यांनाही कामाला लावले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून आरोपी फिरोज ऊर्फ मोनु खान (रा. बांद्रा पश्चिम) याची माहिती समजली.
त्यानुसार बिजनौर, उत्तर प्रदेश येथे गेला असल्याचे समजल्याने पोलीस पथक रवाना करण्यात आले. पोलीस आल्याचे समजताच तो दिल्ली येथे गेला. त्यानुसार पोलीसही दिल्लीत दाखल झाले आणि आरोपी फिरोज ऊर्फ मोनू नईम खान याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरलेल्या २४ मोबाईल पैकी १४ लाख ५६ हजार ३०० रुपयांचे २२ मोबाईल हस्तगत करण्यात आले. तसेच त्यांचेकडे केलेल्या चौकशी मध्ये त्याने नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजी. क्रमांक १६४/२०२४ भा.द.वि.स. कलम ३८०,४५७,३४ प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, डंपर चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात आरोपी भाईंदर ते परभणी मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेज तपासले. तपासादरम्यान आरोपी वैजनाथ लक्ष्मण लांडगे (वय-६७ वर्षे, रा. साईबाबा नगर, परभणी) यांचे नाव समोर आले. तसेच तो अपघातात जखमी झाल्याने परभणी येथील रुग्णालात दाखल असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी रुग्णालय गाठले असता डंपर चंद्रकांत गणपतराव जाधव (रा. जालना) यांना विकल्याचे त्याने सांगितले. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा कक्ष १ ने डंपर जप्त केला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, एसीपी मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे पो.निरी अविराज कुराडे, सपोनिरी प्रशांत गांगुर्डे, सपोनि पुष्पराज सुर्वे, पोउपनि राजू तांबे, एसआय संदीप शिंदे, हवालदार अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, समिर यादव, सुधीर खोत, विकास राजपूत, अंमलदार प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, गौरव बारी, सौरभ इंगळे, धिरज मॅगाणे, संतोष चव्हाण (सायबर विभाग) यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com