काशिमिरा गुन्हे शाखा – १ नी अवजड वाहने (ट्रक / टेम्पो) चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीतांना ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
काशिमिरा: अटक आरोपीतांकडून ४ करोड ७५ लाख रु. किमतीची ५३ वाहने जप्त.

दिनांक २३/१२/२०२२ रोजी ०९.०० ते दिनांक २५/१२/२०२२ रोजी ०७.०० वाजेच्या दरम्यान फिर्यादी विनयकुमार हिरालाल पाल, वय ४७ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. डी / ७०४, रोझ गार्डन सिध्दी विनायक नगर, काशिमीरा, मिरारोड पूर्व यांनी त्यांचे मालकीचा एक आयशर कंपनीचा १११० मॉडेलचा टेम्पो क्रमांक एम.एच.०४. जेके. ८३०८ जुवा, हा ते राहत असलेल्या सोसाटीचे समोर रोडवर मोकळ्या जागेत पार्क करुन ठेवला असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी करुन नेलेबाबत काशिमीरा पोलीस ठाणेव गु.र.नं. ९०२/२०२२ भा.दं.वि.सं. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा का १, काशिमीरा मार्फत गुन्हयाचा समांतर तपास सुरु होता. त्यानुसार घटनास्थळावरील सी.सी.टि.व्ही फुटेजचे अवलोकन करुन मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी नामे १) फारुख तैय्यब खान, वय ३६ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. फखरुद्दीनका, पो. टप्ग्रा, ता. टिजारा, जि. अलवार, राजस्थान २) मुबिन हारिस खान, वय ४० वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. फखरुद्दीनका, पो. टप्ग्रा, ता. टिजारा, जि. अलवार, राजस्थान यांची नावे निष्पन्न झाल्याने नमूद आरोपीतांना राजस्थान पोलीसांचे मदतीने दिनांक ०८/०१/२०२३ रोजी अटक करण्यात आली.
गुन्हे तपासात अटक आरोपीतांनी गुजरात, राजस्थान व हरीयाणा राज्यांतील १२ सह आरोपीतांसह महाराष्ट्र, हरीयणा, उत्तरप्रदेश, दिल्ली इत्यादी राज्यांतून टेम्पो / ट्रक चोरी करुन त्यावरील मुळ इंजिन व चेसिस नंबर बदलून त्यावर बनावट तयार केलेल्या कागदपत्रां प्रमाणे असलेले इंजिन व चेसिस नंबर टाकून विविध आर.टी.ओ. विभागात रिअसाईन (नोंदणी) केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे गुजरात, राजस्थान व हरीयणा येथील पोलीस व आर.टी.ओ. चे मदतीने एकुण ४,५०,००,०००/- रुपये किमतीची एकूण ५३ वाहने त्यात ४८ आयशर टेम्पो, ०२ टाटा टेम्पो, ०१ अशोक लेलैण्ड टेम्पो व ०२ क्रेटा कार अशी वाहने जप्त करुन महाराष्ट्र, हरियाना, उत्तरप्रदेश, दिल्ली राज्यातील २२ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत व इतर जप्त ट्रकची आयशर कंपनीचे तज्ञ यांना बोलावून त्याचेकडून मुळ मालक यांचा शोध घेणे चालू आहे.
आरोपींवर पालघर, नाशिक, हरियाणा , दिल्ली, नंदुरबार आणी उत्तर प्रदेश मध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी श्री अविनाश अंबुरे ,पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री अमोल मांडवे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष -1 काशिमीराचे पो.नि.श्री. अविराज कुराडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, पुषपराज सुर्वे, सुहास कांबळे,स.फौजदार.राजु तांबे,संदिप शिंदे, किशोर वाडीले, संजय पाटील, संतोष चव्हाण,पो.हवा.अविनाश गर्जे, संजय शिंदे,संतोष लांडगे, पुषपेंदर थापा, सचिन सावंत, प्रफुल्ल पाटील, विकास राजपुत, समीर यादव, पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी,तसेच 1) चौपानकी, पोलीस ठाणे,राजस्थान 2) एस.ओ.जी.राजस्थान 3) पेथापुर,पो.ठाणे गांधीनगर, 4) गुन्हे शाखा अहमदाबाद, राज्य गुजरात यानी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com