Share Market APP ” मध्ये ऑन लाईन गुंतवणुक करण्यास सांगून फसवणुक केलेल्या 5,53,851/- रुपयांपैकी 4,80,000/- रुपये रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात काशिगांव पोलीसाना मोठे यश…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मिरा रोड :-दिनांक- २१/०८/२०२४.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्ताल वातील काशिगांच पोलीस स्टेशन परीसरात राहणारे- श्री. ज्युलीयन गौराचंद दलाई, ४१७ वर्षे, रा. हाटकेश, मिरारोड पूर्व यांना “Share Market APP” मध्ये गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक झाली होती.

सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिगाव पो. ठाणे येथे गुन्हा रजि.नं.१ २१४/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (सी), ६६(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

नमूद तक्रारीबाबत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाचत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता, साक्षीदार यांची रक्कम वेगवेगळ्या बैंकखात्यात वळती झाल्याचे दिसून आले. त्याअनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबावत संबंधीत बैंकेसोचत पत्रव्यवहार करून संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर मा. न्यायालयाकडून फिर्यादी/साक्षीदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिगाव पोलीस ठाणेचे अधिकारी/अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने साक्षीदार श्री. ज्युलीयन गौराचंद दलाई, ४७ वर्षे, रा.हाटकेश, मिरारोड पूर्व वांची फसवणुक झालेल्या रकमेपैकी 4,80,000/- रुपये रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे.

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी प्यावयाची काळजी…
Telegram Channel, facebook, Instagram अवया Watsapp पर जास्त परतावा देणाऱ्या Promotional Adds पर विश्वास ठेवु नका. याद्वारे आपली आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता आहे.

अश्या प्रकारच्या फसवणुकीमध्ये Telegram Channel, Watsapp Group कर अॅड करुन तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे Sceenshot, Massages दाखवून पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत केले जाते. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही लोकांचे बैंक स्टेटमेंट मध्ये त्यांना फायदा झालेली रक्कम दाखवून फसवणूक करण्यात येते. एकदा गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणुकदारांना जास्त व खात्रितिर परताव्याची हमी देतात. अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.

Work From Home नावाखाली Online You Tube Video Like Tasks, Hotel/Movie Ratingया सारखा गुंतवणुक करण्याऱ्या बनावट जाहिरातींना बळी पडू नये. जास्त परताया अमिष दाखविणाऱ्या कोणत्याही ट्रेडिंग अॅपवर विश्वास ठेवू नये तसेच ट्रेडींग अॅपची विश्वासार्हता तपासून गुंतवणुक करू नये.

Share Market, Forex Trading, Crypto Investment, Mutual Funds मधील गुंतवणुक करण्याअगोदर आपल्या वित्तीय
सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

कोणतेही अनाधिकृत अॅप्लीकेशन डाऊन लोड करु नये अथवा अनोळखी लिंक वर क्लिक करु नये.

ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बैंकेला संपर्क करावा.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोचत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा, तसेचwww.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्प लाईनवर संपर्क साधून तक्रार यावी.

सदरची कामगिरी श्री. प्रकाशगा यकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, मिरारोड, श्री. विजयकुमार मराठे, सहा. पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक श्री. राहुल सोनवणे, पोहवा/०७१२८ सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.

सायबर फसवणुक हेल्पलाईनक्रमांक- १९३०

सायबर फसवणुक हेल्पलाईन वेवसाईट
www.cybercrime.gov.in

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट