मिरा भाईंदर शहरात गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस विक्री करणाऱ्या आरोपीला काशिगाव पोलिसांनी केली अटक …

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

भाईंदर :-शिवकुमार पासवान असे अटक आरोपीचे आहे.

मिरा भाईंदर शहरात उत्तर प्रदेश मधून एक इसम गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस विक्रीसाठी घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिस कर्मचारी मंगेश रक्षे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे काशिगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुल पाटील यांनी २ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना घोडबंदर येथील फॉउंटन हॉटेल जवळ सापळा रचण्यासं सांगितले होते.

दरम्यान रात्री साडेबाराच्या सुमारास मिळाल्या माहितीनुसार संशयित इसम त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आला. त्यावरून त्याची झडती घेतली असता त्याकडे गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतूस आढळले. शिवकुमार पासवान असे या आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट