कासार वडवली पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या उमेश ठाकुर यास ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :- कासारवडवली वाहतूक विभाग अंतर्गत असलेला पॉईंट -नागला बंदर या ठिकाणी दिनांक-15/06/2024 रोजी 18.00 वा ते 21.00च्या सुमारास सपोनि सानप,पोहवा जाधव,पो.ना काळे, पो.अं मुंढे, पो.अं सुनिल पाटील असे कर्तव्यावर असताना एक 5जी ऍक्टिवा मो. सायकल क्र MH- 48 BU- 2617 वरील एका इसमास विदाउट हेल्मेट चे चालान केले असता,सदर मोटार सायकल मालकास चालानची माहिती गेल्याने, सदर मोटार सायकल ही चोरी झालेली असल्याने मालक यांनी तेथे मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली तक्रार दिलेली असल्याने तेथे संपर्क साधून माहिती दिल्याने,डोंबिवली पोलिसांनी कासरवडवली वाहतूक विभागास संपर्क साधून वरील माहिती दिली.
नमूद अधिकारी व अंमलदार यांनी भाईंदरपाडा, घोडबंदर रोड ठाणे पश्चिम परिसरात सदर मोटार सायकलचा व इसमाचा शोध घेऊन त्यास मोटार सायकल सह ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने सदर मोटार सायकल मानपाडा डोंबिवली परिसरातून चोरी केल्याची खात्री झाल्याने मानपाडा पोलीस स्टेशन, डोंबिवली यांना संपर्क साधून बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अशी उल्लेखनीय कामगिरी स पो निरी सानप व पथक,कासारवडवली वाहतूक उप विभाग यांनी केली आहे.
आरोपीचे नाव – उमेश बैजनाथ ठाकूर 38वर्षे राह. भायंदर पाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम ( गावचा पत्ता – कर्मा, पोस्ट मंधनिया, ps -इतखोरी, झारखंड)
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com