कासा पोलीस ठाणे येथे दाखल खूनाच्या गुन्ह्याची अवघ्या ४ तासात उकल करण्यात पालघर पोलीसांना यश…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:- दि.०९/०३/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजण्याचे पुर्वी सोमटा घाटाळपाडा येथे फॉरेस्ट प्लाटात रस्त्यापासून सुमारे १५ फुट अंतरावर कोणीतरी अज्ञात इसमाने मयत नामे कृष्णा रामा डोंगरकर वय ६५ वर्षे रा. सोमटा घाटाळपाडा ता. जि. पालघर यास कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने मानेवर खुपसून व गंभीर दुखापत करून त्याचा खून केलेबाबत फिर्यादी नामे काशिराम कृष्णा डवला वय ४८ वर्षे, (पोलीस पाटील, सोमटा गाव) रा. सोमटा, गावठाणपाडा ता. जि. पालघर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७६/२०२४ भा.द.वि.सं. कलम ३०२, प्रमाणे दि.१०/०३ /२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांनी श्री. गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / नामदेव बंडगर, प्रभारी अधिकारी, कासा पोलीस ठाणे, पोनि/अनिल विभुते, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना तपास पथक तयार करून कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या.

त्याप्रमाणे कासा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून सदर पथकाने गोपणीय माहिती मिळवून गुन्ह्यातील मयत याचा मुलगा रामदास कृष्णा डोंगरकर याचेकडे मयत याचे बाबत विचारपुस केली असता तो घटनेची माहिती ही सतत बदलून सांगत होता.

तसेच तो वारंवार पिण्यासाठी पाणी मागत असल्याने तसेच त्याचे हातापायास सतत घाम येवून बोलण्यात अडखळत असल्याने सदरचा गुन्हा त्यानेच केला असावा असा अधिक संशय बळावल्याने मयत याचे राहते घराची पाहणी केली असता सदर घराचे बैठक रूममध्ये ताज्या शेणामातीने सारवलेल्या जागेत ठिकठिकाणी रक्त पडल्याचे दिसून आल्याने त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक कसून चौकशी केली असता मयत याचा चुलत भाऊ नामे जयराम देवजी डोंगरकर व मुलगा रामदास कृष्णा डोंगरकर याचे बरोबर मयत कृष्णा रामा डोंगरकर यांचेत जमीन वारसा हक्कावरून वाद असून मा. प्रांत कार्यालय, पालघर येथे दावा चालू आहे.

सदर आरोपीत याचे मयत वडील हे आपल्याला जमीन मिळू देणार नाही असे सतत गावात बोलत असत. त्याच्या अशा बोलण्यामुळे आपल्याला जमीन मिळणार नाही याचा त्यास व त्याचे चुलत भाऊ विलास चिंतु डोंगरकर यास राग होता. त्या रागातूनच दोघेही एकत्र येवून यातील मयत हे त्याचे राहते घरी झोपलेले असताना मुलगा रामदास डोंगरकर याने त्याचेकडील लोखंडी विळ्याने वडीलांचे मानेवर डावे बाजूला गालाचे खाली मारून गंभीर दुखापती करून जिवे ठार मारले. नंतर सदरची घटना कोणाला माहिती पडू नये या भितीपोटी मयत वडीलांचे प्रेत चुलत भाऊ विलास चिंतु डोंगरकर याचे मदतीने घरातून उचलून नेवून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने सोमटा, घाटाळपाडा येथील फॉरेस्ट विभागाच्या प्लॉटमध्ये रस्त्याचे कडेला सुमारे १५ फुट अंतरावर बाजूला फेकूण दिलेबाबत कबुली दिली आहे. सदर गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण तपास करून गुन्हा घडल्यापासून ४ तासाचे कालावधीत गुन्हा उघडकीस आणून आरोपीत १) रामदास कृष्णा डोंगरकर, २) विलास चिंतु डोंगरकर दोन्ही रा. सोमटा घाटाळपाडा ता. जि. पालघर यांना ताब्यात घेवून तात्काळ अटक करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोनि / नामदेव बंडगर, प्रभारी अधिकारी, कासा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगीरी ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / नामदेव बंडगर, प्रभारी अधिकारी, कासा पोलीस ठाणे, पोनि / अनिल विभुते, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउपनि / संदिप नागरे, नेम. कासा पोलीस ठाणे, पोउपनि / स्वप्नील सावंतदेसाई, पोउपनि / रविंद्र वानखेडे, पोहवा / कैलास पाटील, पोहवा / दिनेश गायकवाड, पोहवा/संजय धांगडा, पोहवा / राकेश पाटील, पोहवा / दिपक राऊत, पोहवा / नरेंद्र पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच सहा. फौज. आर. के. चौधरी, पोहवा/राजु भोये, पोहवा/६९१ मनोज भोये, पोना / ८३२ सुनिल गावंढा, चालक पोना/लोहार, पोना/०९ योगेश भोये, पोना/९१८ धुम सर्व नेमणुक कासा पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट