कार्यसम्राट ना. भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामाच्या कार्याप्रणालीवर प्रभावित अनेक भाजप कार्यकर्त्यांचा जाहिर प्रवेश.  

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगाव रायगड माणगांव :-माणगांव तालुक्यातील नागांव ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा लावत पहिल्यांदा तालुक्यात आपल्या सत्तेचे पाऊल ठेवले होते. सरपंच, उपसरपंच, दोन  सदस्य निवडून आल्याने  तालुक्यात पहिल्यांदाज एका ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला होता.  पक्षश्रेष्ठींनी भरभरुन कौतुक करत मोठा जल्लोष साजरा केला होता परंतु हा जल्लोष, आनंद तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकारी यांना जास्त काळ टिकवता आलेला नाही. ग्रामपंचायतीवर सत्ता जरी भाजपची असली तरी उपसरपंच, सदस्या यांनी सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आणि कार्यसम्राट ना. भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांच्या  कार्यप्रमाणालीवर प्रभावित होऊन अखेर शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कार्यसम्राट ना.  भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत नागांव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच अक्षय किसन माने, सदस्या दिप्ती दिनेश मोरे,  भाजप तालुका चिटणीस  महेंद्र कासरेकर, युवामोर्चा सोशल मिडिया संयोजक दिनेश मोरे, तालुका सोशल मिडिया संयोजक विनोद कासरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर  कासरेकर, महादे भावकी यांनी काल दि. ७ फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह गोरेगांव येथे जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशाने नागांव गांवातील भाजपच्या सत्तेला खिंडार नव्हे तर भगदाड पडल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट