कर्ण कर्कश्य (मोठ्या – मोठ्या आवाजात) साऊंड बॉक्सवर गाणे वाजवणाऱ्यां 5 ईसमांविरूद्ध गुन्ह्याची नोंद पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
🎯 याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, घटना दिनांक-29- 10- 2023 रोजी चे रात्री 23.30 वाजताचे सुमारास मौजा- नागमंदिर जवळ आंबाटोली, फुलचूर गोंदिया येथे यातील आरोपीत ईसंम नामे -
1) राजेन्द्र ओमप्रकाश अजिते वय २४ वर्ष
2) अमित कैलाश राउत वय २९ वर्षे
3) योगेश रमेश बिलोने वय २१ वर्षे
4) स्वप्नील विजय लबाडे वय २२ वर्षे
5) अंकित योगेश नेवारे वय १९ वर्षे, सर्व रा. नागमंदिर जवळ आंबाटोली, फुलचुर, गोंदिया
यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाने वादय वाजविण्यासंदर्भात दिलेल्या नियमांचे - नियमावली ( गाईड लाईनचे) उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर चौकात साउड बॉक्सवर कर्ण कर्कश्य (मोठ- मोठया आवाजात) नागरिकांना, रहीवाशांना त्रास होईल अशारितीने गाणे वाजवितांना मिळुन आल्याने स.फौ. मलेवार यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे आरोपी यांचेविरूध्द अपराध क्रमांक 453/2023 कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे...
पोलीस प्रशासनातर्फे गोंदिया जिल्ह्यातील वाद्य/ डी.जे. चालक - मालक यांना सन, उत्सव, काळात तसेच सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक सोहळा निमित्याने वाद्य/डी.जे. चा वापर करतांना वाद्ययंत्र वाजविणाऱ्याना असे आवाहन करण्यात येते की, मा.सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांचे दिलेल्या अटी- शर्तीचे वेळ मर्यादेचे पालन करावे, सामान्य नागरिकांना रहिवासी यांना त्रास होईल अशा पद्धतीने डी.जे. किंवा वाद्ययंत्र कर्ण कर्कश्य मोठया आवाजात वाजवू नये. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होवू शकते असे यावरुन दिसून येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com