करमाळा येथे लोकस्वराज प्रतिष्ठान तर्फे कोरोना काळातील विधवांना एक शेळीचे वाटप – अँड सविता शिंदे

प्रतिनिधी-दिप्ती भोगल
करमाळा : लोकस्वराज ग्रामविकास प्रतिष्ठाण, जेऊर, एकल महिला पुनर्वसन समिती, महाराष्ट्र व महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, पुणे यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील सोळा कोरोना विधवांना प्रत्येकी एका शेळीचे वाटप करण्यात आले. अशी माहिती लोकस्वराज प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ऍड. सविता शिंदे यांनी दिली.

याप्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. मानेसाहेब म्हणाले की, एक शेळी व्यवस्थित संभाळल्यास सुमारे एक वर्षाने करोना विधवा महिलेचे घर त्या उत्पन्नावर चालू शकेल. त्यामुळे कोरोना विधवांना शेळी वाटपाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.
ऍड. सविता शिंदे यांनी कोरोना विधवांना शेळी वाटप करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. कोरोना महामारीमुळे अनेक तरुण लोकांचे प्राण गेले त्यामुळे अचानक असंख्य महिलांवर संकट कोसळले.

त्यातून आपले कुटुंब सावरण्यासाठी अशा महिलांना मदतीची गरज असल्यामुळे शेळी वाटपाचा उपक्रम करत असल्याचे त्यांनी सागितले. या उपक्रमास महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, हेरंब कुलकर्णी व ऍड. संध्या गोखले इत्यादींनी सहकार्य केल्याचेही ऍड. सविता शिंदे यांनी सांगितले. तसेच महिलांनी शेळीपालन उद्योगातून प्रगती करावी असे आवाहन केले.
याप्रसंगी कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच लोकस्वराज प्रतिष्ठानचे सम्राट जाधव, ऍड. योगेश शिंपी, तेजस ढेरे, आशा चांदणे नूतन शिंदे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास बाळासाहेब करचे, नितीन खटके, ऍड. अपर्णा पद्माळे ,साधना खरात उपस्थित होत्या. कार्यक्रमास हेमंत शिंदे, आरती शिंदे, माया कदम, दत्ता हिरडे, विजया कर्णवर ईत्यादिनी सहकार्य केले. प्रेरणा व्होटकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमात तालुक्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते शंकर बाबुराव रोकडे तथा रोकडेदादा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com