नक्षलग्रस्त भागातील बेरोजगार युवक- युवती करीता रोजगार मेळाव्या चे आयोजन पो. ठाणे सालेकसाचे स्तुत्य उपक्रम…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

     मा. श्री निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री अशोक बनकर सा. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली, उपविभागिय पोलीस अधिकारी सा. आमगांव यांचे उपस्थितीमध्ये गोंदिया जिल्हा पोलीस विभागातर्फे दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत नक्षलग्रस्त भागातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी BSA corporation Ltd. Pune NAPS/ national apprenticeship promotion scheme IITP schem गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे समन्वयाने ITI Deploma व पदवीधर अनुभवी युवक-युवतींना रोजगार प्रदान करण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन सालेकसा येथे पुणे येथील नामांकित ८ कंपनी विविध ५५० पदांच्या भरतीसाठी दिनांक ०८/०८/२०२३ रोजी सकाळी १०/०० वा. ते सायंकाळी १७/०० वा. पर्यंत गडमाता मंदीर सालेकसा येथील हॉल मध्ये रिक्रुटमेन्ट ड्राईव्ह / रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला.

सदर मेळाव्यामध्ये पोस्टे कार्यक्षेत्रातील २८०० ते ३००० युवक-युवती रोजगार मेळाव्याचे लाभ घेण्यास हजर आले होते. सदर मेळाव्यास उपस्थित युवक-युवतींना मा. श्री अशोक बनकर सा. अपर पोलीस अधिक्षक सा. देवरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पर्वते सा. यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच BSA corporation Ltd. Pune कंपनीचे प्रतिनिधी सुनील अहिरे यांनी मुलांना मार्गदर्शन करून २६० बेरोजगार युवक-युवतींना पुणे येथील BSA corporation Ltd. Pune तर्फे NAPS / National apprenticeship promotion scheme मध्ये विविध पदावर नेमणुक करून जागेवरच नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच ४०० मुलांचे बायोडाटा घेवुन त्यांना रिक्त पदावर नेमणुक देणार असल्याचे सुनील अहिरे यांनी सांगितले. सदर मेळाव्यास उपस्थित सर्व मुलांना पोस्टे सालेकसा तर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

             सदर रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजना करीता पोस्टे सालेकसा येथील पोलीस अधिकारी पोनि श्री. बाबासाहेब बोरसे, यांच्या मार्गदर्शनात सर्व बिट अंमलदार यांनी गावोगावी जावुन सदर रोजगार मेळाव्या संबंधी ग्रामभेट घेवुन रोजगार संबंधी जनजागृती करण्यात आली. तसेच पोलीस पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना सदर रोजगार मेळाव्या संबधी माहिती देवनु युवक-युवतींना जास्ती - जास्त संख्येत हजर राहुन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याबाबत माहिती दिली. सदर रोजगार मेळावा आयोजीत करणे कामी ठाणेदार श्री बाबासाहेब बोरसे, पोलीस निरीक्षक पोस्टे सालेकसा व पोलीस स्टेशन सालेकसा येथील पोउपनि शिंदे, पोहवा / चंद्रीकापुरे, पोशि पगरवार, मपोशि उके व पो.स्टॉप तसेच नक्षल सेल गोंदिया येथील सपोनि नाईक, श्रेणी पोउपनि खापेकर, प्रोपागंडा सेल येथील पोशि हरीणखेडे यांच्या अथक परिश्रमामुळे सदर रोजगार मेळावा यशवीरित्या पार पडले.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट