कराड तालुक्यात वारंवार शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळीला सातारा पोलीसांनी केले २ वर्षाकरीता तडीपार…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- सातारा जिल्हयामध्ये कराड तालुक्यातील कराड तारनुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराचिरुब्दचे गुन्हे करणारे टोळी प्रमुख
१) शुभम शंकर काकडे, वय २५ वर्षे, रा. शिवाजीनगर मलकरपुर कराड ता कराड जि सातारा तसेच टोळी सदस्य
२) समीर ऊर्फ सॅम नुरमोहंमद मोमीन, वय २९ वर्षे, रा. मुजावर कॉलनी, कराड ता कराड जि सातारा
३) विजय बिरु पुजारी, वय २३ वर्षे, रा. परापंतनगर मलकापुर कराड ता फराड जि सातारा
४) अल्फाज कासीम शेख, वय २४ वर्षे, रा. मोरया कॉलनी मलकापुर कराड ता कराड जि सातारा
५) अकीय लियाकत पठाण, वय २४ वर्षे, रा. मलकापुर कराड ता कराड जि सातारा
६) प्रसाद ऊर्फ बंटी अशोक गाडे, वय ३१ वर्षे, औदूचर कॉलनी, मलकापुर कराड ता कराड जि सातारा
७) अक्षय दिलीप पुमाळ, वय २१ वर्षे, तुळजाईनगर मलकापूर कराड ता कराड जि.सातारा यांचेवर सातारा जिल्हयामध्ये खून करणे, दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, दंगा मारामारी करून मारहाण करणेबाबतचे शरिराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कराड तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व्ही.टी. पाटील, पोलीस निरीक्षक, कराड तालुका पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुस्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५१ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा, तसेच सांगली जिल्हयातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतथा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता, सदर प्रस्तावाची चौकशी अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी केली होती.







या टोळीमधील इसमांना दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेचर वेळोवेळी अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते.
तसेच त्यांचंवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने त्यांचा लोकांना फार मोठया प्रमाणावर उपद्रव होत होता, असा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीस मा. समीर शेख, हड़पार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्यत्रे पूर्ण सातारा जिल्हा, तसेच सांगली जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेत पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासुन १७ उपद्रवी टोळयांमधील ५८ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार
आहेत. यामध्ये हदपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आँचल दलाल यांचे
मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा मातारा, पो.हवा प्रमोद मायंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, कराड तालुका पोलीस ठाणेचे पोहचा सज्जन जगताप, पोकों प्रफुल्ल गाडे यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com