कराड शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यानी २४ तासात दरोडयाचा गंभीर गुन्हा केला उघड

उपसंपादक-रणजित मस्के
कराड :
गुन्हयातील रोख रक्कम 2,89,34,000/- रुपये हस्तगत व 10 आरोपी यांना केली अटक
दिनांक 15/10/2024 रोजी रात्री 1.20 वा चे सुमारास यातील फिर्यादी मुंबई पार्टीचे 3 कोटी रुपये रोख रक्कम क्रेटा गाडी MH12 ML6005 मधुन घेवून मुंबई ते हुबळी अशी घेवुन नात असताना कराड गावचे हद्दीत कोल्हापुर नाक्यावरुन कोल्हापुर बाजुकडे जात असताना एक पांढरे रंगाची स्विफ्ट गाडी ही पाठलाग करुन मलकापुर ता. गावचे हद्दीत बेबेवाडी फाटयाचे पुढे आडवी मारुन स्विफ्ट गाडीमधून दोन अनोळखी मुले खाली उतरली तसेच दुचाकी मोटार सायकलवरून आणखी दोन अनोळखी इसम असे उतरले. त्यापैकी एकाने हॉकीस्टिकने क्लिनर साईटची काच फोडली. तसेच स्विप्ट गाडीतील दोन इसमांनी गाडीचा दरवाजा उघडून” गाडी का दावली असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करु, लागले.
त्यापैकी एकाने मला हाताने लाथाबुक्याने मारहाण करून ड्रायव्हर सिट जवळील मोकळ्या जागेमधुन मला मागे ढकलून दिले. उर्वरित दोन इसमांनी अविनाश यास मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर आमची गाडी जबरदस्तीने घेवुन जावून एकाने चाकुचा धाक दाखवून तुम्ही काय काम करता, गाडी कचरापेटीच्या जवळ भरता, आम्हाला तुमच्या बद्दल सर्व माहीती आहे. तुमच्या जवळ काय आहे तुम्ही ते काढून ह्या नाहीतर आमचे आम्ही काढल तर तुम्ही एक सुध्दा जिवंत राहणार नाही तुम्हाला जिवे ठार मारून टाकतो असे म्हणुन आम्हाला मारहाण करून गाडी गमेवाडी घाटामध्ये थांबवून आमचेजवळ असणारी 3 कोटी रुपये एवढी रोख रक्कम ही आम्ही भितीपोटी त्यांना काढून दिली. त्यानंतर त्यांनी आमचे डोळ्यावर रुमाल बांधला व गाडी थोडे पुढे घेवुन गेले. व आमचे गाडीतील रक्कम दुसरे एका चारचाकी गाडीत ठेवली ती गाडी तेथुन निघुन गेली. त्यानंतर आमची गाडी डी मार्ट मॉलचे पुढील बाजुस असणारे नांदलापुर गावाजवळ रोडवर त्यानंतर आमची गाडी डी मार्ट मॉलचे पुढील बाजुस असणारे नांदलापुर गावाजवळ रोडवर हायवेवर त्यांनी थांबवली. व त्यानंतर ते सर्व निघुन गेले. तसेच आम्हाला तुम्ही येथून सरळ पुढे कोल्हापुर कडे 20 कि.मी जायचे वांबायचे नाही, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणुन ते तेथून निघुन गेले म्हणून माझी वरील अज्ञात 5 इसमाचे विरुध्द कायदेशिर तक्रार आहे. म्हणून वगैरे मजकुराची खबरीवरुन कराड शहर पोलीस ठाणे 1375/2024 भा.न्या.खूं.का. 2023 कलम 311,140(1),324(4) प्रमाणे दिनांक 16/10/2024 रोजी दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास श्री. आर.ए. ताशिलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे हे करत होते. सदर गुन्हयाचे तपासामध्ये मोबाईल नंबरचे विश्लेषण करुन त्यामधिल संपर्क करणारे मोबाईल नंबरचे बाबत साक्षीदार यांचे कडे अधिक कसोशीने चौकशी केली असता यामध्ये गुन्हयामध्ये खालील प्रमाणे आरोपी 1. आसिफ सलिम शेख रा. शिदे गल्ली कराड 2. सुलताना शकील सय्यद वय रा. मंगळवारपेठ करडी पीराजवळ कराड ता. कराड 3.. अजमेर ऊर्फ अज्जू मोहम्मद मांगलेकर वय 36 वर्षे रा. अष्टमंगलकार्यालय समोर, गोळेश्वर कार्वेनाका कराड ता. कराड । जि. सातारा 4. नजर महम्मद आरीफ मुल्ला वय 33 वर्षे रा. 262 रविवारपेठ कराड 5. ऋतुराज धनाजी खंडग वय 29 वर्षे रा. तांबवे ता. कराड जि. सातारा 6. ऋषिकेश धनाजी खंडग वय 26 वर्षे रा. तांबवे ता. कराड 7. करीम अजीज शेख वय 35 वर्षे रा. 192 मंगळवारपेठ कराड ता. कराड 8. अक्षय अशोक शिंदे वय 29 वर्षे रा. तामजाई गल्ली तांबवे ता. कराड सातारा 9. नजीर बालेखान मुल्ला वय 33 वर्षे रा. राजीवनगर सैदापुर कराड ता. कराड 10. शैलेश शिवाजी घाडगे वय 24
वर्षे रा. निमासोड ता. खटाव जि. सातारा 11. अविनाश संजय घाडगे वय 29 वर्षे रा. निमासोड ता. खटाव जि. सातारा हे आरोपी निष्पन्न करुन नमुद आरोपी यांचे कडुन गुन्हयातील जबरी चोरी केलेली रक्मम 2,89,34,000/- हजार रुपये एवढी रक्कम आज पावेतो हस्तगत करण्यात आली असुन आरोपी यांनी वापरलेले

वाहने स्विफ्ट गाडी, इनोव्हा, सियाज तसेच HF डिलक्स, जुपीटर, अशी जप्त करण्यात आलेली आहेत.
नमुद आरोपी यांची दिनांक 22/10/2024 रोजी पर्यंत पोलीस अभिरक्षा मंजुर करण्यात आलेली असुन सदर आरोपी यांचे कडे तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. समीर शेख सो पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर, सो. अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री अमोल ठाकुर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व आर.ए. ताशिलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे, श्री. अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बधे, सपोनि फारणे, सपोनि. तारु, सपोनि भापकर, सपोनि, माळी, मसपोनि जाधव, मसपोनि आवंले, मसपोनि. वाघमोडे, मपोउपनि. शितल माने, पोलीस उपनिरीक्षक, शिगाडे, डिसले, पोउपनि भंडारे, पोउपनि मगदूम, अशोक वाडकर, अमोल सांळुखे, सपना सांळुखे, राजेंद्र गायकवाड, मपोहवा पुष्पा चव्हाण, पोलीस नाईक अनिल स्वामी, संदीप कुभार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, पो.शि. संदीप शेडगे, आनंदा जाधव, धीरज कोरडे, महेश शिंदे, अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमिन, संग्राम पाटील, सागर भोसले, विजय गुरव, दिपक सांळुखे, आकाश मुळे, अमित चव्हाण, संजय गायकवाड कपील आगलावे, शितल गवळी, महिला पोलीस सोनाली पिसाळ, स्थागुशा सातारा यांचे कडील शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, गणेश कापरे, मुनीर मुल्ल्ला, लक्ष्मण जगधने अमित माने, मोहन पवार, स्वप्नील दाँड, शिवाजी भिसे, स्वप्नील कुंभार, शिवाजी गुरव, पृथ्वीराज जाधव, पंकज बेचके, यांनी सदरची कारवाई केलेली आहे . अशी माहिती मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा यांचे मान्यतेने देण्यात आली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com