कराड शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कामगिरी घरफोडीतील आरोपीला केले अटक…

0
WhatsApp Image 2023-09-09 at 11.44.42 AM
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

साताराकराड

मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक बापु बागंर सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे व डीबी पथकाने कराड शहरात भरवस्तीत झाले घरफोडीतील आरोपीस अटक केले आहे.

दिनांक 06/09/2023 रोजी कराड शहरातील गजबलेले ठिकाण बुधवार पेठ कराड येथील लोक वस्तीत घरफोडीचा प्रकार झाला होता. त्याबाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला असून कराड शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आर.एल.डांगे व पथक कसोटीने सदर गुन्हयाचा तपास करीत होते. मेन रोड परिसरात एक इसम चोरीचे सोने विक्रीसाठी आल्याची माहिती डीबी पथकास मिळताच पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे व पथकाने मेन रोड सराफ बाजार परिसरात गस्त सुरु केली त्यावेळी एक इसम सोनाराचे दुकानात संशईत रित्या चौकशी करीत असताना मिळुन आला त्यास ताब्यात घेवुन कौशल्य पुर्ण तपासकरता आरोपी नामे बण्या ऊर्फ विकास अशोक वाघमारे रा. बुधवार पेठ कराड याने गुन्हयाची कबुली दिली असुन त्यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयात चोरीस गेलेला 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक बापु बागंर सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक डांगे सो, सफी रघुवीर देसाई, सफी संजय देवकुळे पोलीस हवा. शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव,, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, रईस सय्यद सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट