कराड शहर डीबी पथकाने अपहरण करून खुन करणाऱ्या गुन्हेगाराना अवघ्या तासात केली अटक…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो. सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप सूर्यवंशी सो कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ओगलेवाडी पोलीस दूरक्षेत्रचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. संदीप शितोळे सो, पोलीस उप निरीक्षक श्री. आर.एल.डांगे व डीबी पथकाने अपहरण करून खुन करणाऱ्या गुन्हेगारास 02 तासाचे आत केली अटक.

कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील ओगलेवाडी परीसरातील राजमाची हजारमाची भागात प्रेम प्रकरणातून एका इसमाचा खुन झाला सदर बाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्हयातील आरोपीना कराड शहर डी बी पथकाने अवघ्या 02 तासात लोकेशन व गोपनिय बातमीदारचे मदतीने अटक केली आहे. हकीकत अशी की, आरोपी बाबासाहेब पवार रा. हजारमाची ता. कराड यांची मुलगी राजमाची गावात राहणारा प्रविण पवार याचेसोबत पळुन गेल्याचा संशय होता. सदर प्रकरणाची माहिती आरोपी बाबासाहेब पवार व त्यांचे इतर साथीदार नातेवाईक यांना मिळाली होती. त्यामुळे सदरचे आरोपी हे त्या युवकाचे मागोव्यावर होते. दिनांक 30/10/2023 रोजी सकाळी 10.15 वा. चे दरम्यान आरोपी बाबासाहेब याची मुलगी व युवक हे यशंवतराव चव्हाण कॉलेज परिसरातून पळुन गेले. त्याचा राग मनात धरून आरोपी बाबासाहेब पवार रा. हजारमाची ता. कराड जि. सातारा हा व त्याचे साथीदार यांनी युवकाचे वडील, भाऊ व पळून जाण्यास मदत केली असा संशय असलेले मयत इसम जनार्धन गुरव यांना राजमाची गावातुन अपहरण करुन सुली घाटात नेवुन मारहाण केली सदर मारहाणीत जनार्धन गुरव हा इसम मृत्युमुखी पडल्याने आरोपी रानावनात पसार झाले होते. सदर आरोपीना कराड शहर डी. बी. पथकाने अवध्या 02 तासात लोकेशन व गोपनिय बातमीदारचे मार्फतीने एकुण 06 आरोपीत यांना अटक केली असुन बाकी आरोपीत यांचा शोध सुरु आहे. अटक आरोपीत यांना दिनांक 06/11/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो., मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे सो, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक डांगे सो, पोलीस उपकनिरीक्षक पवार, सफो संजय देवकुळे पोलीस हवा. सचिन सुर्यवंशी, शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो.शि. चिरज कोरडे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट