कल्याण पूर्वेत 5/ड प्रभाग क्षेत्रात आणि डोंबिवलीतील ६/फ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बॅनर/पोस्टर विरोधात धडक कारवाई

0
Spread the love

प्रतिनिधी-विश्रवनाथ शेनोय

कल्याण

*दि. ०८ कल्याण ठाणे
कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून अनधिकृत होर्डिंग हटविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठकीत दिले होते.
त्याअनुषंगाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ५/ड प्रभागक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या जाहिरात बॅनर/पोस्टरवर ५/ड प्रभागाचे सहा आयुक्त उमेश यमगर यांच्या पथकाने कठोर कारवाई केली.
५/ड प्रभागातील काही शिक्षण संस्था व क्लासेसमार्फत महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ५/ड प्रभाग क्षेत्रात विविध ठिकाणी जाहिरात बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले होते.

त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण झाले असून, परिसराच्या स्वच्छतेवर तसेच नागरी सौंदर्यावर परिणाम झाला होता, ५/ड प्रभागाच्या पथकामार्फत संबंधित बॅनर/पोस्टर्स तात्काळ हटविण्यात आले आणि संबंधित 5 जाहिरातदारांविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंधक अधिनियम, 1995 च्या कलम 3 नुसार कोळशेवाडी पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद काल दाखल करण्यात आली आहे.

तर डोंबिवलीच्या ६/फ प्रभागातही सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या पथकाने डोंबिवली पूर्व येथील कल्याण रोडवरील दोन होर्डिंग, खंबाळपाळा रस्त्यावरील दोन होर्डिंग ,कांचनगाव भोईरवाडी येथील एक होर्डिंग अशा पाच होर्डिंग वर निष्कासनाची कारवाई काल दिवसभरात केली.
सद्यस्थितीत अवकाळी हवामानामुळे, पत्र्याचे किंवा वाऱ्याला अडथळा ठरणारे फलक लक्षात घेता धोकादायक, अनधिकृत व परवानगी संपुष्टात आलेले होर्डीग्स, बॅनर्स संबंधितांनी स्वतःहून हटवावेत.
सार्वजनिक ठिकाणी कोणतीही जाहिरात करण्यापूर्वी महानगरपालिकेची परवानगी घेणे अनिवार्य आहे. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

तरी आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि विद्रूपतेच्या विळख्याबाहेर ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिके मार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट