कल्याण झोन कडून चरस, एम.डी व गांजा हा पदार्थ विक्री करणारे ४ जण ताब्यात..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

ठाणे

परीमंडळ ३ कल्याण मध्ये अवैध धंदयावर कारवाई करणेकरिता विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन सदर पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण व पोलीस पथक हे संयुक्तरित्या खाजगी वाहनाने गस्त करीत असताना

१) मानपाडा पोलीस स्टेशन हददीत सुदर्शन मार्बल समोर, सावित्रीबाई फुले नाटयगृह जवळ, एम.आय.डी.सी. रोड, डोंबिवली पूर्व येथे एक इसम नामे सनिल श्रीनाथ यादव, वय २५ वर्ष रा. रूम नं २०२, नांदीवली टेकडी, आनंद बंगलो डोंबिवली पुर्व हा त्यांचे ताब्यात एकुण ८.४८ ग्रॅम वजनाचा १६,५००/- रूपये किंमतीचा एम. डी. हा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळलेला मिळुन आल्याने त्याचेवर मानपाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १३६/२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२) बाजारपेठ पोलीस स्टेशन हददीत दुर्गामाता चौक, भटेला तलाव येथील मोकळ्या जागेत, कल्याण पुर्व येथे इसम नामे शंकर महादेव गिरी, वय ४६ वर्षे, धंदा मजुरी रा. मुपो. टाकळी अम्या, ता. आष्टी, जि. बीड हा त्यांचे ताब्यात एकुण ९ किलो ९५० ग्रॅम वजनाचा १,००,०००/- रूपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळलेला मिळुन आल्याने त्याचेवर बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १३२/२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३) डोंबिवली पोलीस स्टेशन हददीत राजाजी पथ, स्वामी नारायण मंदिरा बाजुस असलेल्या मोकळया जागेत, रामनगर, डोंबिवली पुर्व येथे इसम नामे १) सचिन एकनाथ कावळे, वय ३२ वर्षे, रा. रूम नं ०२, वसंत किणे चाळ, प्रगती कॉलेज मागे, डी.एन.सी. रोड डोंबिवली पुर्व २) अमन विरेदं गुप्ता उर्फ पप्पु, वय १६ वर्षे, रूम नं ०१, सुगंधी चाळ, दत्तनगर, डोंबिवली पुर्व यांनी मिळून त्यांचे ताब्यात एकुण २३.५३ ग्रॅम वजनाचा एम.डी. हा अंमली पदार्थ व १० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ एकुण ९३,९४३/- रूपये किंमतीचा अंमली पदार्थ विकी करीता सोबत बाळगल्याचे मिळून आल्याने त्याचेवर डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ११७/२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) सह २० (अ), २१(ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच परिमंडळ ३ कल्याण मध्ये १ जानेवारी २०२५ ते आजपावेतो विशेष अंमली पदार्थ कारवाई पथकामार्फत अंतर्गत एकुण १३ गुन्हे दाखल असुन सदर गुन्हयात १९ आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचेकडुन ६३ ग्रॅम एम. डी. पावडर, २३२ कोडीनयुक्त बॉटल व नशेच्या गोळया तसेच ४७ किलो ०४४ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकुण १२ लाखापेक्षा जास्त रुपये किमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री. आशुतोष डुंबरे साो., मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण साो, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. संजय जाधव साो, यांचे आदेशाने, श्री. अतुल उत्तमराव झेंडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ. ३ कल्याण यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रशांत चव्हाण, पोना शांताराम कसबे, पोशि गौतम जाधव, पोशि राजेंद्र सोनावणे यांच्या विशेष पथक तसेच डोंबिवली पोलीस ठाणेचे वपोनि जावदवाड, सपोनि /कोकरे, मानपाडा पो. स्टे. चे पोनि / गुंड, सपोनि / राळेभात व बाजारपेठ पोलीस ठाणेचे पोनि / दुकले, सपोनि राठोड यांचेकडुन कामगिरी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट