साईकृपा सद्गुरू फाउंडेशन तर्फे रोहा येथील कालकाई प्रसन्न वृद्धाश्रमात गृहोपयोगी वस्तू व फळवाटप…
प्रतिनिधी-दिप्ती भोगल
रोहा : गुरुवार दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी रोहा येथे साईकृपा सद्गुरु फाउंडेशन एनजीओ ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत भाऊ गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कालकाई प्रसन्न वृद्ध आश्रम मध्ये महाराष्ट्र महिला अध्यक्ष विदिशा विकी रामाने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रम मध्ये जेवणासाठी लागणारे सर्व गृहपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.





अश्या अन्य आवश्यक वस्तू आणि फळ वाटप करण्यात आले उपस्थित प्रमुख सल्लागार श्री. विकी भाऊ रामाने, सोशल मीडिया प्रमुख विध्यान भाऊ, उपसचिव खुर्शिद भाऊ, NGO सदस्य अक्षता ताई, अपूर्वा ताई इत्यादीं मित्रपरिवार उपस्थित होते .



तसेच निघताना वृद्धाश्रमात त्यांच्या सहकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत भाऊ यांनी या आश्रम मध्ये येऊन आम्हाला आजी आजोबां बरोबर वेळ घालवण्यासाठी संधी दिली आणि गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यासाठी केलेल्या सहकार्यांसाठी आभार व्यक्त केले.





असेच यापुढेही वृद्ध आश्रम मध्ये काही सहकार्याची मदत लागली तर नक्कीच एनजीओला कळवावं, साईकृपा सद्गुरु फाउंडेशन एनजीओ ऑल इंडिया हे सर्व आपल्या सोबत आहेत असे सांगून कार्यक्रमाची सांगता केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com