काळेपडळ पोलीसांनी हद्दीत गावठी हातभट्टी दारू विकणारया सुलतान बागवान यांस केले जेरबंद..
सह संपादक -रणजित मस्के
पुणे
विशेष मोहीम दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना इसम नामे सुलतान सादिक बागवान वय 33 वर्ष रा. गल्ली नंबर 24/ए सय्यदनगर मोहम्मदवाडीरोड हडपसर पुणे हा आपल्या ताब्यात 7510/ रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू लोकांना विक्री करीत असताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध काळेपडल पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 218/2025 मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे,
इसम नामे कुंदन निकलेश गौतम वय 28 वर्ष राहणार कृष्णानगर मोहम्मद वाडी हडपसर पुणे हा आपल्या ताब्यात 5000/ रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू लोकांना विक्री करीत असताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 219/2025 मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे,
वरील कारवाई दरम्यान एकूण 12510/ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,
अशी माहिती मानसिंग पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी दिली