काजुपाडा येथे सुमित घाग मित्र मंडळातर्फे शिव जन्मोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
बोरीवली ;
भाजपा वॉर्ड क्र 11
सुमित घाग मित्र मंडळ (रजि)
( सामाजिक संस्था )
आयोजित उत्सव माझ्या राजाचा शिव जन्मोत्सवानिमित्त बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.




यावेळी आधारस्तंभ सन्मा. श्री. प्रविणभाऊ दरेकर ( आमदार गटनेते विधान परिषद ) यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत राजा छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक हनुमान टेकडी पासून ते संपूर्ण परिसरातून कलावती आई मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे.
यानंतर बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता ढोल ताशाच्या गजरात आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांची स्थापना करण्यात येईल.
त्यानंतर सायंकाळी ७ ते ९ या वेळात विभागातील महिलांसाठी हळदि कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्यानंतर विभागातील युवक व युवती साठी सोलो डान्स व ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना प्रोत्साहन म्हणून रोख रक्कम व पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम सालाबाद प्रमाणे काजुपाडा , कलावती मंदिरासमोर, माने कंपाऊंडच्या बाजुला , काकश्री चायनीज येथे आयोजित करण्यात येणार आहे अशी माहीती सुमित घाग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुमित घाग ( समाजसेवक) यानी दिली.