कैकाडी मोहल्ल्यात दारुच्या अड्यावर छापा १३ लाखाची दारु व गुळ मिश्रीत रसायन केले जप्त स्वागुशा जालना यांची कार्यवाही

सह संपादक- रणजित मस्के
जालना


जालना शहरात कैकाडी मोहल्ला येथे अवैध हातभट्टीची दारु पाडणा-या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाचत मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल यांनी सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अनंत कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी जालना, श्री. पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने वरील पथकाने जालना शहरातील पोलीस ठाणे कदीम जालना हथोत कैकाडी मोहल्ला येथे जावून या बाबत माहीती काढून, महीला नामे सुमित्रा महादु गायकवाड वय 40 वर्ष रा. कैकाडी मौहल्ला जालना हि खालील साहीत्यासह मिळूण आल्याने तिचेकडून हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायण, ड्रम, गावठी असे हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी उपयोगी पडणारे साहीत्य असा एकुण 1,38000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस स्टेशन कदीम जालना जी. जालना येथे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, श्री. अनंत कुलकणी, उप विभागीय पोलीस अधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, श्री. योगेश उबाळे, सपोनि, पोउपनि राजेंद्र वाघ, रमेश राठोड, रामप्रसाद पव्हरे, प्रभाकर वाघ रुस्तुम जैवाळ, रमेश काळे, सचीन राऊत, महीला पो. अं काकडे सर्व ने. स्थागुशा जालना यांनी केली आहे.