शहर वाहतुक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यानी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत काढली रॅली

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के कोल्हापूर;दि.०१/०१/२०२५ ते दि.३१/०१/२०२५ दरम्यानचे मुदतीत रस्ता सुरक्षा अभियान २०२५ कोल्हापूर जिल्हा पोलीस दल यांचे वतीने साजरा करण्यात येत आहे. यामध्ये वाहतूकीस शिस्त निर्माण व्हावी. तसेच नागरीकांकडून वाहतूकी संबधीच्या नियमांचे पालन व्हावे आणि जनजागृती व्हावी या करिता राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन केले आहे.सदर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक सोो, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली दि. २८/०१/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वा.भवानी मंडप येथुन विदयाथ्यर्थ्यांची रॅली आयोजित करण्यात आली होती. सदर रॅलीचे उ‌द्घाटन श्रीमती जयश्री देसाई, अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाकरीता श्री. अजित टिके, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, कोल्हापूर, पोलीस निरीक्षक जुनाराजवाडा श्री. संजीव झाडे, पोलीस निरीक्षक शाहुपूरी श्री. संतोष डोके, पोलीस निरीक्षक राजारामपुरी श्री. सुशांत चव्हाण तसेच उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्री. चंद्रकांत माने, उपशिक्षणाधिकारी श्री, दिगंबर मोरे, महापालिका सहा. आयुक्त श्रीमती नेहा आकुर्डेकर, आरएसपी चे जिल्हा समादेशक श्री. श्रीकांत मोरे, उपसमादेशक सचिन यादव, शहर समादेशक सौ. मोरबाळे, आरएसपी अधिकारी श्री. वागरे श्री दिपक कांबळे, महापालिका फायर अधिकारी श्री. रणभिसे, केएमटीचे श्री. सुनिल जाधव, श्री. नितिन पोवार, श्री. काशिद, श्री. काळे इत्यादी मान्यवर हजर होते.मा.अपर पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर श्रीमती जयश्री देसाई मॅडम यांनी फ्लॅग दाखवुन रॅली सुरुवात भवानी मंडप येथुन सुरु झाली पुढे जेल रोड, बिंदु चौक, छ. शिवाजी महाराज पुतळा चौक, महापालिका, सीपीआर चौक, दसरा चौक मार्गे जुने ट्रॅफिक ऑफिस ते जैन बोडींग अशी संपन्न झाली रॅली मध्ये १) शा. कृ. पंत वालावलकर, २) केर्ली माध्यमिक विदयालय ३) महाराष्ट्र हायस्कुल ४) वि.स. खांडेकर ५) छ. राजाराम हायस्कुल ६) कोरगावकर हायस्कुल ७) उषा राजे हायस्कुल ८) हणमंतवाडी हायस्कुल ९) राजर्षि शाहू हायस्कुल जुना बुधवार या शाळांचे सुमारे ६०० विदयार्थी व विदयार्थिनी तसेच शिक्षक वृंद यांनी भाग घेतला होता रॅली दरम्यान नागरीकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करु नये, वेग मर्यादा पाळावी, वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर करा, असे वगैरे बॅनरद्वारे व मेगाफोन द्वारे प्रबोधनात्मक आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट