जुन्या वैमनस्यावरून महेंद्र मदारकर याचा तलवारीने निर्घृण खून अवघ्या काही तासातच स्था. गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील तिघां आरोपींतांना केले जेरबंद

सह संपादक – रणजित मस्के
गोंदिया

खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासातच उलगडा
—-▪️▪️▪️—-
🔹 याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, आज दिनांक 12 मे 2025 रोजी चे साधारण 09.30 वा . ते 10.00 वा. दरम्यान विशाल उईके यांचे घरामागे, कारंजा, गोंदिया येथे अज्ञात आरोपीतांनी मृतक इसम नामे- महेंद्र नत्थु मदारकर वय 49 वर्ष रा. भद्रुटोला, कारंजा गोंदिया याला अज्ञात कारणावरून आरोपींनी तलवारीने डोक्यावर, गळ्यावर, हनुवटीवर, गालावर, पायावर, वार करून गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार केल्याने फिर्यादी रामप्रसाद मदारकर राहणार , कारंजा गोंदिया याचे तक्रारीवरून पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे अपराध क्रमांक- 299/2025 कलम 103(1),3(5) भारतीय न्याय संहिता 2023, सह कलम 4, 25 भा.ह. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे...... सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हे घटना करून पसार झाले होते...
🔸 सदर खून प्रकरण घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याकरीता गोंदिया ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांची वेगवेगळी पथके नेमण्यात आलेली होती…… स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गुह्याच्या घटनास्थळी अत्यंत तत्परतेने भेट देऊन… गुन्ह्याची सखोल माहिती घेत प्रत्यक्ष घटना घडतांना पाहणारे, तसेच घटना करुन पसार झालेल्या आरोपींची इत्यंभूत माहिती घटनास्थळ परिसरातील लोकांकडून गोळा करून अथक परिश्रम घेवून खुन करणारे आरोपीत इसम नामे-
1) गुलशन प्रकाश उके वय 32 वर्षे राहणार – कारंजा गोंदिया
2) राजबब्बर इंदल रंगारी वय 35 वर्षे राहणार भद्रुटोला कारंजा, गोंदिया
3) अजय लक्षुराम कल्लो वय 35 वर्षे राहणार हिमगिरी ले आऊट, कारंजा गोंदिया*
यांना मौजा बोळूदा तालुका गोरेगाव येथून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले... खून प्रकरण गुन्हयाचे अनुषंगाने नमूद तिन्ही आरोपींना सखोल चौकशी विचारपूस केली असता.....आरोपीतांनी संगनमत करून जुन्या वैमनस्यावरून मृतक- महेंद्र मदारकर यास तलवारीने वार करून गंभीर जखमी करून जिवानिशी ठार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींताना गुन्ह्यात अटक प्रक्रिया गुन्ह्याचा सखोल तपास अनुषंगाने गोंदिया ग्रामीण पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहेत..... मा. वरिष्ठांचे निर्देश मार्गदर्शनात गुन्ह्याचा पुढील अधिकचा तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत.
🔸 पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे दिलेले निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी,गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीतांचा तत्परतेने शोध घेवून आरोपींना गुन्ह्यात जेरबंद करण्याची कामगीरी ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात मपोउपनि वनिता सायकर, पोउपनि शरद सैदाने, पो.अंमलदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, नेवालाल भेलावे चित्तरंजन कोडापे, सोमेंद्र तूरकर, तुलसी लुटे,विठ्ठल ठाकरे, सुजित हलमारे, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजीत बिसेन, सुबोध बीसेन, संतोष केदार, अजय रहांगडाले, दुर्गेश पाटील, मपोशी कुमुद येरणे, स्मिता तोंडरे, चापोशि घनश्याम कुंभलवार, राम खंदारे, लक्ष्मण बंजार यांनी कामगिरी बजावली आहे.